तांडव वेब सिरीजवर बंदी घालण्याची आणि राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्याची मागणी

जबलपूर (मध्यप्रदेश) येथे प्रशासनाला निवेदन सादर

उपविभागीय अधिकारी श्रीमती दिव्या अवस्थी (उजवीकडे) यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते

जबलपूर (मध्यप्रदेश) – अमेझॉन प्राईमवरील तांडव या वेब सिरीजमध्ये हिंदूंच्या देवतांचा अनादर करून धर्मभावना दुखावल्या गेल्या आहेत आणि जातीयद्वेष पसरवण्यात आला आहे. त्यामुळे या सिरीजवर तात्काळ बंदी आणावी आणि त्यातील दोषी कलाकारांवर कठोर कारवाई करावी, तसेच प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाची होणारी विटंबना रोखण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत, या मागण्यांचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कर्मवीर शर्मा यांच्या नावे उपविभागीय अधिकारी श्रीमती दिव्या अवस्थी यांना देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. अनिल गणोरकर, सौ. अर्चना गणोरकर,

सौ. संजना गणोरकर आणि धर्मप्रेमी श्री. राजेंद्र कोष्टा उपस्थित होते.