मुसलमान तरुणाकडून हिंदु असल्याचे सांगत हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे लैंगिक शोषण

मध्यप्रदेशात लव्ह जिहादविरोधी कायद्यांतर्गत पहिला गुन्हा नोंद

प्रेम करण्यासाठी धर्म का लपवावा लागतो, हे निधर्मीवादी सांगतील का ? अशा धर्मांध वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हातपाय तोडण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

प्रतिकात्मक चित्र

बडवानी (मध्यप्रदेश) – येथे मुसलमान तरुण सोहेल मंजूम मंसुरी याने ‘सनी’ असे हिंदु नाव सांगून एका हिंदु युवतीला विवाहाचे आमिष दाखवून गेली ४ वर्षे तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. दोन दिवसांपूर्वी या दोघांमध्ये काही कारणावरून भांडण झाले होते. त्यानंतर युवतीने बोलण्यास नकार दिला. तेव्हा सोहेल याने तिला मारहाण केली. यानंतर तिने केलेल्या तक्रारीवरून सोहेल याच्याविरोधात लव्ह जिहादविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.