केंद्र सरकार मुलींच्या विवाहाचे योग्य वय किती असावे, याविषयी निर्णय घेणार
|
भोपाळ (मध्यप्रदेश) – १५ वर्षांची मुलगीदेखील प्रजननक्षम असते, असे डॉक्टर सांगतात, तर मग मुलींच्या विवाहाचे वय २१ करण्याची काय आवश्यकता आहे ? शिवराजसिंह चौहान मोठे डॉक्टर झाले आहेत का?, असे विधान काँग्रेसचे माजी मंत्री आणि नेते सज्जनसिंह वर्मा यांनी केले आहे. मध्यप्रदेचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एका कार्यक्रमात बोलतांना ‘मुलींच्या विवाहाचे वय १८ ऐवजी २१ केले पाहिजे’, असे म्हटले होते, त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. केंद्र सरकार लवकरच मुलींचे विवाहाचे वय निश्चित करण्याचा निर्णय घेणार आहे. ‘संबंधित समितीने अहवाल दिल्यानंतर लगेचच यासंबंधी निर्णय घेण्यात येईल’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेले आहे.
#WATCH | According to doctors, a girl is ready for reproduction by the age of 15. Is the CM a doctor or a scientist? So, on what basis does girls’ marriage age should be increased to 21 from 18: Congress leader Sajjan Singh Verma in Bhopal pic.twitter.com/sVF1UyeLra
— ANI (@ANI) January 13, 2021
सज्जनसिंह वर्मा यांनी पुढे म्हटले की, अल्पवयीन मुलींवर होणार्या बलात्काराच्या प्रकरणांमध्ये मध्यप्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. अशा प्रकरणांमध्ये कडक कारवाई करण्याऐवजी मुख्यमंत्री ढोंगीपणाचे राजकारण करत आहेत.
The former minister also accused the BJP government in the state of “failing to protect minor girls” #MadhyaPradesh #MP #RE https://t.co/yiuNhHspln
— IndiaToday (@IndiaToday) January 13, 2021
भाजपचा विरोध, तर काँग्रेसकडून बचाव करण्याचा प्रयत्न !
भाजपच्या नेत्या नेहा बग्गा यांनी सज्जनसिंह वर्मा यांच्यावर टीका करतांना म्हटले की, हा देशातील मुलींचा अपमान आहे. स्वतःच्या पक्षाच्या प्रमुख एक महिला आहेत, हे वर्मा विसरलेत का? प्रियांंका वाड्रादेखील एक महिला आहेत. माझी सोनिया गांधी यांना विनंती आहे की, त्यांनी सज्जनसिंह यांना जाहीर क्षमा मागण्यास सांगावे आणि पक्षातून हाकलून द्यावे.
दुसरीकडे काँग्रेसने सज्जन सिंह यांचा बचाव करताना ‘ते केवळ डॉक्टरांची बाजू सांगत होते. भाजप विनाकारण विषय तापवत आहे.’