CM Yogi Aerial Survey Of Mahakumbh : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून कुंभक्षेत्री येणार्‍या सर्व मार्गांची हवाई पहाणी !

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

प्रयागराज, १ फेब्रुवारी (वार्ता.) – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हेलिकॉप्टरमधून कुंभक्षेत्रात येणार्‍या सर्व मार्गांची पहाणी केली. त्यांनी वसंतपंचमीला असणार्‍या स्नानासाठी केलेल्या सिद्धतेचा आढावा घेतला. ‘रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होऊन भाविकांना कुंभक्षेत्री पोचण्यास समस्या आहेत का ?’, या सर्व गोष्टी त्यांनी जाणून घेतल्या. हवाई पहाणी करून झाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी संगम काठाची पहाणी केली आणि अमृतस्नानही केले.