मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विमानतळाचे उद्घाटन !

अमरावती : अमरावती विमानतळ १६ एप्रिलपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे. याआधी येथील विमानतळाची सेवा विशेष महनीय व्यक्तींसाठीच होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटन झाले. रेल्वेने अमरावतीहून मुंबईला यायला १२ घंटे लागतात. या विमानसेवेमुळे हे अंतर केवळ पावणे २ घंट्यांचे होणार आहे.
१. अमरावती विमानतळाची निर्मिती वर्ष १९९२ मध्ये झाली होती. तेव्हापासून हे विमानतळ केवळ विशेष महनीय व्यक्तींसाठीच चालू होते.
२. या विमानतळाच्या धावपट्टीची लांबी १ सहस्र ८५० मीटर असून ४५ मीटर रुंद आहे. याच विमानतळावर आशिया खंडातील सर्वांत मोठ्या एअर इंडियाचे वैमानिक प्रशिक्षण केंद्र उभारले जात आहे. ऑक्टोबर २०२५ पासून या विमानतळावरून रात्रीच्या वेळीही विमानसेवा चालू राहील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या 'उडान' योजनेंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनानुसार महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीद्वारे (MADC) अमरावती विमानतळ विकसित करण्यात आले आहे. MADC द्वारे अमरावती विमानतळाचा अत्याधुनिक पायाभूत सुविधांसह विकास… pic.twitter.com/EMvTvXodW5
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 16, 2025
३. या विमानसेवेमुळे अमरावतीच्या दळणवळणाला चालना मिळेल. औद्योगिक विकास, तसेच कापड उद्योगही भरभराटीस येतील.
अमरावतीतील ‘वैमानिक प्रशिक्षण केंद्र’ दक्षिण आशियातील सर्वांत मोठे केंद्र असेल ! – मुख्यमंत्रीअमरावतीत ‘वैमानिक प्रशिक्षण केंद्र’ चालू होणार आहे. यामुळे अमरावतीचे नाव जगाच्या नकाशावर येईल. हे दक्षिण आशियातील सर्वांत मोठे केंद्र असेल. येथे वैमानिकांना प्रशिक्षण मिळेल, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळाच्या उद्घाटप्रसंगी केले.
या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘येथे प्रशिक्षण केंद्र चालू होणार असल्याने देशाला चांगले वैमानिक आणि प्रशिक्षकही मिळतील.’’ |
४. हे विमानतळ उड्डाण योजनेअंतर्गत असल्याने तिकीट सर्वसामान्यांना परवडणारे आहे. दुरांतो एक्सप्रेसच्या प्रथम श्रेणी वातानूकुलित तिकिटाच्या शुल्कापेक्षा मुंबई विमान प्रवासाचे शुल्क अल्प आहे. भविष्यात मागणीनुसार तिकिटांचे शुल्क वाढू शकते.
५. आठवड्यातून ३ दिवस, म्हणजे सोमवार, बुधवार आणि शुक्रवार, अशी ही विमानसेवा उपलब्ध असेल. हे विमान मुंबईवरून दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी उड्डाण करेल. अमरावतीवरून ४ वाजून ४० मिनिटांनी मुंबईसाठी मार्गस्थ होईल आणि सायंकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी मुंबईत पोचेल.
गोमांसाची अवैधरित्या वाहतूक करणारा सरफराज ख्वाजा याला अटक
सिडको परिसरातील तलावांमधील प्रदूषणाची चौकशी होणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री
ग्रामीण भागांत २० विद्यार्थ्यांमागे ३ शिक्षक अनुज्ञेय ! – डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री
लहान मुलांना सनातन धर्माची सोप्या भाषेत ओळख करून देणारे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित !
‘शिक्षक पात्रता परीक्षे’ची (‘टीईटी’ची) प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रहित !
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !