Shivamogga Idgah Maidan : शिवमोगा (कर्नाटक) येथे वक्फ मालमत्ता असल्याचा दावा करत मैदानाला कुंपण !

ईदगाह मैदानाला कुंपण घातल्याने वक्फ समर्थक आणि विरोधक यांच्यामध्ये वाद

शिवमोगा (कर्नाटक) : वक्फ मालमत्ता असल्याचा दावा करत येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच्या मैदानाला कुंपण घातल्याने वक्फ समर्थक आणि विरोधक यांच्यामध्ये नुकताच वाद झाला. या वेळी निर्माण झालेला तणाव पोलीस अधीक्षक जी.के. मिथुनकुमार यांनी हस्तक्षेप करून शांत केला.

१. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच्या ईदगाह मैदानात सोमवारी ईद-उल-फित्रच्या दिवशी विशेष नमाजाची व्यवस्था करण्यात आली होती. दुसर्‍या दिवशी त्या मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर १० फूट उंचीचे कुंपण उभारण्यात आले.

२. मैदानाला कुंपण घातल्याने वाहने उभी करण्यास अडथळा निर्माण झाला असून ते त्वरित हटवण्याची मागणी स्थानिकांनी केली.

३. या वेळी विश्व हिंदु परिषद आणि भाजप यांचे नेते तेथे आले आणि त्यांनी कुंपण हटवण्याची मागणी केली. मैदानाची जागा महानगरपालिकेची असून मुसलमानांना तेथे केवळ नमाजपठण करण्याची अनुमती देण्यात आली असल्याचा दावा त्यांनी केला.

४. ‘ही वक्फ बोर्डची जागा आहे, सार्वजनिक जागा नाही. येथे नमाजसह इतर धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात’, असा दावा मुसलमानांनी केला.

५. यामुळे तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलीस घटनास्थळी पोचले. बेकायदेशीरपणे कुंपण घालणार्‍यांवर गुन्हा नोंद करून कुंपण हटवा, अशी मागणी करत लोकांनी तेथेच आंदोलन चालू केले.

संपादकीय भूमिका

कुठल्याही भूमीवर स्वतःचा अधिकार सांगून ती बळकावणार्‍या वक्फ बोर्डाला वठणीवर आणण्यासाठीच वक्फ कायदा रहित करणे आवश्यक आहे, हे यातून दिसून येते !