हिंदूंची मंदिरे अतिक्रमणमुक्त व्हावीत, ही सर्व संतांची मागणी ! – आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंदगिरीजी महाराज
भारतातील अनेक ठिकाणी ज्या धार्मिक स्थळी खोदकाम झाले आहे, तेथे हिंदूंचा सांस्कृतिक ठेवा आढळला आहे. त्यामुळे ‘प्लेसेस ऑफ वर्शिप अॅक्ट’द्वारे ज्या हिंदूंच्या मंदिरांवर अतिक्रमण झाले आहे, ती मुक्त व्हायला हवीत. ही सर्व संतांचीही मागणी आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.