Import Tariff on China : अमेरिकेकडून चीनवर आता २४५ टक्के आयात शुल्क लादण्याची घोषणा !

अमेरिका आणि चीन यांच्यातील शुल्क युद्ध चिघळले !

प्रतिकात्मक चित्र

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या वस्तूंवर १२५ टक्के आयात शुल्क लादण्याच्या चीनच्या निर्णयाला प्रत्युत्तर म्हणून चीनच्या वस्तूंवर २४५ टक्के आयात शुल्क लादण्याची घोषणा अमेरिकेने केली आहे.

याविषयी व्हाईट हाऊसने म्हटले आहे की,

१. ७५ हून अधिक देशांनी नवीन व्यापार करारांवर चर्चा करण्यासाठी अमेरिकेशी आधीच संपर्क साधला आहे. परिणामी चर्चा चालू असतांना वैयक्तिक वाढीव शुल्क स्थगित ठेवण्यात आले आहे. तथापि चीनने प्रत्युत्तर दिल्यामुळे आता चीनला अमेरिकेत होणार्‍या त्यांच्या मालाच्या आयातीवर २४५ टक्के शुल्क आकारले जाईल.

२. काही महिन्यांपूर्वी चीनने गॅलियम, जर्मेनियम, अँटीमनी आणि इतर प्रमुख उच्च-तंत्रज्ञान सामग्रीच्या निर्यातीवर बंदी घातली होती, तर या आठवड्यात त्याने ६ जड दुर्मिळ धातू, तसेच दुर्मिळ चुंबक यांची निर्यात रोखली आहे.

३. चीनच्या या कृतींचा उद्देश ‘जगभरातील ऑटोमेकर्स, एरोस्पेस उत्पादक, सेमीकंडक्टर कंपन्या आणि सैनिकी कंत्राटदार यांना महत्त्वाच्या घटकांचा पुरवठा रोखणे’, हा असल्याचा दावाही व्हाईट हाऊसने केला आहे.