|
नवी देहली – देहली विद्यापिठाच्या लक्ष्मीबाई महाविद्यालयातील वर्गाची भिंत प्राचार्यांनी शेणाने सारवल्यावरून वाद निर्माण झाला आहे. देहली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष रौनक खत्री यांनी १५ एप्रिल या दिवशी प्राचार्या प्रत्युषा वत्सला यांच्या कार्यालयाच्या भिंतींवर शेण लावले. ते म्हणाले की, ‘प्रत्येकाने थोडा थंडावा मिळवला पाहिजे’, अशी उपरोधिक टीका केली.
१. या संदर्भात कुलगुरु योगेश सिंह म्हणाले की, जर या पद्धतीने (शेण सारवून) खोल्यांमधील उष्णता अल्प करता येत असेल, तर प्राचार्यांनी प्रथम स्वतःच्या घरी आणि कार्यालय येथे तसे करून पहावे. वर्गखोल्यांमध्ये कूलर आणि पंखे यांची कमतरता दूर करावी. त्या १० वर्षांपासून प्राचार्य आहेत, मग त्यांनी याकडे लक्ष का दिले नाही ?
२. या घटनेवर प्राचार्या डॉ. वत्सला म्हणाल्या की, हे संशोधन महाविद्यालयाच्या पोर्टा केबिनमध्ये (एक प्रकारची खोली) केले जात आहे. मी स्वतः खोलीच्या भिंतीवर शेण लावले; कारण माती आणि शेण यासारख्या नैसर्गिक गोष्टींना स्पर्श करण्यात काहीही हानी नाही. काही लोक कोणतीही माहिती नसतांना अफवा पसरवत आहेत.
संपादकीय भूमिकाआजही देशातील अनेक गावांत घरांच्या भिंती आणि भूमी शेणाने सारवली जाते. याचे अनेक लाभ आहेत, हे वेळोवेळी संशोधनातूनच समोर आले आहे. असे असतांना अशा प्रकारचा मूर्खपणा करून त्याला विरोध करणारे हास्यास्पद ठरत आहेत, हे त्यांनी लक्षात घ्यावे ! |