ATM In Panchavati Express : पंचवटी एक्सप्रेसमध्ये एटीएम् यंत्र उपलब्ध !

प्रवासात प्रवाशांना पैसे काढता येणार !

मुंबई : धावत्या रेल्वेत एटीएम् यंत्र बसवून त्यातून प्रवाशांना खात्यातून पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हा रेल्वेचा देशातील पहिलाच प्रयोग आहे. हे एटीएम् यंत्र नाशिकमधील मनमाड ते मुंबई धावणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसमध्ये बसवण्यात आले आहे.

एक्सप्रेसच्या वातानुकूलित डब्यामध्ये हे यंत्र बसवण्यात आले आहे. इगतपुरी ते कसारा या पट्ट्यात नेटवर्कची समस्या आल्यामुळे तेवढा भाग वगळता इतर भागांत एटीएम्’मधून  पैसे काढता येऊ शकतात.