Murshidabad Violence : मुर्शिदाबाद (बंगाल) येथे वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात मुसलमानांकडून हिंसाचार

पोलिसांवर आक्रमण करून त्यांची वाहने जाळली !

मुर्शिदाबाद (बंगाल) – मुसलमानबहुल मुर्शिदाबादमध्ये वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात मुसलमानांकडून करण्यात येत असलेल्या आंदोलनाच्या वेळी त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात हिंसाचार करण्यात आला. त्यांनी मोठ्या प्रमाणात दगडफेक केली, तसेच अनेक वाहनांना आग लावली. यात पोलिसांच्या वाहनांचाही समावेश आहे. त्यांनी पोलिसांवरही आक्रमण केले. सध्या येथे तणावपूर्ण स्थिती आहे.
येथील जंगीपूर पी.डब्ल्यू.डी. मैदानातून वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात मुसलमानांकडून निषेध मोर्चा काढण्यात आला. जेव्हा मिरवणूक राष्ट्रीय महामार्ग १२ रोखण्यासाठी जांगीपूरहून उमरपूरकडे निघाली, तेव्हा पोलिसांनी त्यांना रोखले. यानंतर वाद चालू झाला. त्यातून मुसलमानांनी पोलिसांवर दगडफेक चालू केली. (मुसलमानप्रेमी तृणमूल काँग्रेसचे पोलिसांचे हात बांधले असल्याने ते यावर कठोर कारवाई करून प्रत्युत्तर देऊ शकत नाहीत. ही स्थिती पोलिसांसाठी लज्जास्पद आहे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

मुसलमानबहुल मुर्शिदाबाद येथे मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोर आहेत. ही सत्ताधारी तृणमूल काँग्रेसची मतपेढी असल्याने या मुसलमानांना हिंसाचाराला पाठीशी घालण्यात येणार, हे ठाऊक असल्याने ते सातत्याने विविध प्रकरणात हिंसाचार करत असतात. त्यामुळे आताचा हिंसाचार आश्चर्यजनक नाही !