हिंदूंनी ज्ञानवापी कह्यात घ्यावी ! – तस्लिमा नसरीन

देश-विदेशातील किती मुसलमान सत्य इतिहास मान्य करून असे सांगण्याचे धाडस करत आहेत ? या प्रश्नाचे ‘एकही नाही’, असेच उत्तर मिळते ! याचाच अर्थ धर्मनिरपेक्षता आणि अन्य धर्मांचा आदर केवळ हिंदूंनी करायचा अन् अन्यांनी हिंदूंवर आणि त्यांच्या धार्मिक स्थळांवर आघात करायचे असाच होतो, हे हिंदू आतातरी लक्षात घेतील का ?

ज्ञानवापी मशीद नसून मंदिर आहे !

औरंगजेबाने काशी विश्‍वेश्‍वर मंदिराचा काही भाग पाडून तेथे ज्ञानवापी मशीद उभी केली; मात्र ते तेथील धार्मिक स्वरूप पालटू शकले नाहीत; कारण तेथे शृंगारगौरी, भगवान श्री गणेश आणि अन्य हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती आजही आहेत. त्यामुळे ही जागा मशीद नाही, अशी माहिती हिंदु पक्षाकडून सर्वोच्च न्यायालयात देण्यात आली.

सर्वेक्षणाचा विस्तृत अहवाल सादर करण्यास २ दिवसांची मुदत

‘एकूण ३ दिवस सर्वेक्षण, चित्रीकरण झाले. २५० छायाचित्रे काढण्यात आली आहेत. त्यामुळे प्राथमिक अहवाल सादर केला जाऊ शकतो; मात्र या सर्वांचा विस्तृत अहवाल सादर करण्यासाठी २ दिवस लागतील’, असे सांगत मुदत मागितली. त्याला न्यायालयाने मान्यता दिली.

मुंबईतील २ मशिदींच्या व्यवस्थापकांविरुद्ध गुन्हे नोंद !

सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत ध्वनीक्षेपक लावल्यास त्यासाठीही शासनाने आवाजाची मर्यादा ठरवून दिली आहे; मात्र यांचे उल्लंघन करणार्‍यांवर पोलिसांनी कारवाई करणे अपेक्षित आहे.

अजान देण्यासाठी भोंग्याची आवश्यकता नाही ! – अब्दुल कादिर मुकादम, इस्लाम अभ्यासक

मशिदीवरील भोंगे ७० च्या दशकानंतर चालू झाले. इस्लामचा जन्म झाला, तेव्हापासून ध्वनीक्षेपकावर कधीच अजान दिली गेली नव्हती. त्यामुळे अजान देण्यासाठी भोंग्याची आवश्यकता नाही.

भोंग्यांविषयी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन न करणाऱ्या सर्व राज्य सरकारांवर कारवाई करा ! – ईश्वरप्रसाद खंडेलवाल, राष्ट्रीय अध्यक्ष, लष्कर-ए-हिंद

अजान देणे, हा धार्मिक अधिकार असू शकतो; पण त्यासाठी मशिदींवर भोंगे लावणे, हा धार्मिक अधिकार मुळीच असू शकत नाही.

सोलापूर येथे मनसेच्या कार्यकर्त्यांचे भोंगे आणि ‘ॲम्प्लिफायर’ पोलिसांकडून जप्त !

जप्त करण्यासाठी आमच्याकडे शस्त्रे किंवा हत्यारे होती का ? पोलिसांनी सूडबुद्धीने आमचे भोंगे आणि ‘ॲम्प्लिफायर’ जप्त केले आहेत. राज ठाकरे यांचा आदेश आमच्यासाठी शिरसावंद्य असतो.

… अन्यथा ४ मेपासून हनुमान चालिसा दुप्पट आवाजाने लावणारच !

महाराष्ट्रात मला दंगली घडवायच्या नाहीत, तशी माझी इच्छाही नाही; पण ३ मे नंतर महाराष्ट्रातील मशिदींवरील भोंगे न काढल्यास ४ मेपासून मशिदींसमोर ध्वनीक्षेपकावरून दुप्पट आवाजात ‘हनुमान चालिसा’ लावली जाईलच.

तिसरे महायुद्ध झाले, तर अणूबाँबचा वापर होईल ! – रशिया

युक्रेनला अण्वस्त्रे मिळाली, तर ती रशियासाठी फार धोकादायक ठरू शकतात. रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणामुळे पाश्‍चात्त्य देशांचा दबाव वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर पुतिन यांनी अण्वस्त्रे डागणार्‍या दलास सिद्ध रहाण्याचा आदेश दिलेला आहे.

इंडियन नॅशनल लीगचा कर्नाटक प्रदेशाध्यक्ष अब्दुल रहीम याला अटक

हिजाबच्या वादावरून हिंदूंच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याच्या प्रकरणी सायबर शाखेच्या पोलिसांनी इंडियन नॅशनल लीगचा कर्नाटक प्रदेशाध्यक्ष अब्दुल रहीम याला अटक केली.