हिंदूंनी ज्ञानवापी कह्यात घ्यावी ! – तस्लिमा नसरीन

तस्लिमा नसरीन

नवी देहली – औरंगजेबाने अनेक मंदिरे उद्ध्वस्त केली. शिवमंदिराच्या विद्ध्वंसानंतर औरंगजेबाने त्या ठिकाणी ज्ञानवापी मशीद बांधल्याचे पुरावे मिळाल्यास मला आश्चर्य वाटणार नाही. या प्रकरणात हिंदूंनी ज्ञानवापी मशीद कह्यात घ्यावी.

मला आशा आहे की, ताजमहाल, कुतूबमिनार, हुमायूंचा मकबरा, लाल किल्ला, आगरा किल्ला यांचे अस्तित्व मात्र टिकून राहील, असे ट्वीट बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी केले आहे. (या इमारतीही हिंदूंच्या आहेत. केवळ ज्ञानवापी मिळाल्याने हिंदू संतुष्ट होणार नाहीत, तर हिंदूंच्या सर्वच वास्तू ते परत मिळवणारच ! – संपादक)

संपादकीय भूमिका

देशातील आणि विदेशातील किती मुसलमान सत्य इतिहास मान्य करून असे सांगण्याचे धाडस करत आहेत ? या प्रश्नाचे ‘एकही नाही’, असेच उत्तर मिळते ! याचाच अर्थ धर्मनिरपेक्षता आणि अन्य धर्मांचा आदर केवळ हिंदूंनी करायचा अन् अन्यांनी हिंदूंवर आणि त्यांच्या धार्मिक स्थळांवर आघात करायचे असाच होतो, हे हिंदू आतातरी लक्षात घेतील का ?