(टीप : ‘हिजाब’ म्हणजे डोके आणि मान झाकण्याचे वस्त्र)
दक्षिण कन्नड (कर्नाटक) – येथील ‘उप्पिनंगडी गर्व्हमेंट प्री-यूनिवर्सिटी कॉलेज’मध्ये हिजाब घालून आलेल्या ६ मुसलमान विद्यार्थिनींना महाविद्यालयाने १ आठवड्यासाठी निलंबित केले. या विद्यार्थिनी यापूर्वी अनेकदा हिजाब घालून महाविद्यालयात आल्या होत्या. प्रत्येक वेळी त्यांना त्याची जाणीव करून देण्यात आल्यानंतरही त्यांनी हिजाब घातल्याने अंततः त्यांना निलंबित करण्यात आले. राज्यशासनाने शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबवर बंदी घातली आहे. शासनाचा हा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयानेही कायम ठेवला आहे. तरीही मुसलमान विद्यार्थिनी या निर्णयाला उघडउघड विरोध करत आहेत.
A government pre-university college in Dakshina Kannada district yesterday suspended six students for violation of the college’s dress code, making it first such case.
(Reports @ArunDev1)https://t.co/R9EpTDw6Mu
— Hindustan Times (@htTweets) June 3, 2022
मंगळुरू येथील एका महाविद्यालयात २ जून या दिवशी १६ मुसलमान विद्यार्थिनी हिजाब घालून आल्या असता, त्यांना महाविद्यालय प्रशासनाने वर्गात बसण्याची अनुमती नाकारत परत पाठवले होते. त्यानंतर या विद्यार्थिनींनी याविरोधात जिल्हा आयुक्त कार्यालयात जाऊन तक्रार केली होती; मात्र जिल्हा आयुक्तांनीही या विद्यार्थिनींना शासन आणि न्यायालय यांच्या आदेशाचे पालन करण्यास सांगितले होते. आता या महाविद्यालयाने या विद्यार्थिनींना नोटीस पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
संपादकीय भूमिका
|