महाबळेश्वरमध्ये पर्यटक मुलींचे छायाचित्र काढणारा मालेगावातील धर्मांध अटकेत !

प्रतिकात्मक चित्र

महाबळेश्वर (जिल्हा सातारा) – पुणे येथून महाबळेश्वर पर्यटनासाठी कुटुंबासोबत आलेली मुलगी बाजारपेठत खरेदी करत असतांना मालेगाव येथून पर्यटनासाठी आलेल्या तौफिक इस्तियाक अहमद याने तिचे छायाचित्र काढले. ही गोष्ट मुलीच्या लक्षात येताच तिने कुटुंबियांना याविषयी माहिती दिली. कुटुंबियांनी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. पोलिसांनी तौफिकला अटक केली असून न्यायालयात उपस्थित केले असता तौफिकला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. (अल्पसंख्य धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! – संपादक)

मालेगावच्या ५ जणांना अटक

महाबळेश्वरमध्ये चोरून महिला आणि मुली यांची छायाचित्रे काढणार्‍या ५ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. हे पाचही जण मालेगावचे असून त्यांच्या भ्रमणभाषमध्ये महिला आणि मुली यांची २ सहस्र ५०० छायाचित्रे आढळली आहेत.