सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी समाजाला साधना न शिकवल्यामुळेच मुंबईसारख्या शहरात ९ वर्षांत १० सहस्र ६५७ जण आत्महत्या करतात !

मुंबईमध्ये ९ वर्षांत १० सहस्र ६५७ जणांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

मंत्रालयासमोर पोलीस बंदोबस्त असतांनाही अंगावर रॉकेल ओतून एकाचा आत्महत्येचा प्रयत्न !

विविध मागण्यांसाठी शेतकरी आणि आदिवासी यांचा उलगुलान मोर्चा मुंबईत आला. या पार्श्‍वभूमीवर नवी मुंबईचे पीडित रहिवासी संतोष मोहिते यांनी अधिवेशनकाळात मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला.

‘नेटफ्लिक्स’ या अ‍ॅपच्या आहारी गेलेल्या युवकाच्या प्रेयसीचा निराशेतून आत्महत्येचा प्रयत्न

वाहिन्यांवरील मालिका आणि चित्रपट स्मार्टफोनवर पहाण्यासाठी उपयोग करत असलेल्या ‘नेटफ्लिक्स’ या अ‍ॅपच्या आहारी गेलेल्या युवकाच्या प्रेयसीने तिच्याकडे युवकाचे दुर्लक्ष होत असल्याने निराश होऊन आईच्या झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

अजमेर (राजस्थान) येथे ‘मोमो चॅलेंज’ खेळामुळे एका मुलीने आत्महत्या केल्याची शक्यता

‘ब्लू व्हेल’मुळे भारतासह जगभरात काही मुलांचा मृत्यू झाला होता. आता मोमो चॅलेंज या खेळामुळे भारतात अजमेर येथील एका १० वीत शिकणार्‍या मुलीचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या मुलीने फास लावून आत्महत्या केली.

मंचर (जिल्हा पुणे) येथे नाथपंथीय खडेश्‍वरी महाराजांची आत्महत्या

नाथपंथीय तपस्वी हटयोगी पंथाचे प्रमुख रविनाथ उपाख्य खडेश्‍वरी महाराज (वय ८६ वर्षे) यांनी २८ जुलैला अवसरी फाटा येथील गोरक्षनाथ टेकडी  येथील आश्रमात आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर बडतर्फ कर्मचार्‍याची आत्महत्येची चेतावणी

बडतर्फ कर्मचारी प्रकाश बरडे यांनी नोकरीत पुन्हा घेण्याच्या मागणीसाठी १८ जुलैला विधानभवनाच्या मुख्यप्रवेश द्वाराबाहेर आत्महत्येची चेतावणी दिली. या वेळी पोलिसांनी त्यांना कह्यात घेतले

कांदिवली (मुंबई) येथे ८ वीतील विद्यार्थिनीची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

इयत्ता ८ वीत शिकणार्‍या एका मुलीने कांदिवली (पूर्व) परिसरातील ठाकूर व्हिलेज येथील गुंडेजा इमारतीच्या ८ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. २८ जून या दिवशी ही घटना घडली.

धुळे येथील व्यक्तीचा मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न

धुळे महानगरपालिकेतील कर्मचारी बबन यशवंत झोटे यांनी ११ जून या दिवशी दुपारी १२ वाजता मंत्रालयाच्या समोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. या वेळी पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे अनर्थ टळला.

१२ वीत अल्प गुण मिळाल्याने यवतमाळ जिल्ह्यातील विद्यार्थ्याची आत्महत्या

तालुक्यातील तूपटाकळी या गावातील प्रथमेश विठ्ठल मेहेत्रे (वय १७ वर्षे) या १२ वीत शिकणार्‍या विद्यार्थ्याने अपेक्षेपेक्षा अल्प गुण मिळाल्याने नैराश्यापोटी विषारी औषध प्राशन करून ७ जून ला आत्महत्या केली.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now