B’desh Hindu Police Woman Found Hanging : बांगलादेशात हिंदु महिला पोलीस शिपायाचा गळफास घेतलेला मृतदेह आढळला

  • मानसिक तणावामुळे महिला पोलीस शिपायाने आत्महत्या केल्याचा पोलिसांचा दावा

  • अन्य हिंदु विद्यार्थिनीनेही केली आत्महत्या

महिला पोलीस शिपाई तृष्णा बिस्वास हिचा मृतदेह

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील पटुआखाली जिल्ह्यात १९ जानेवारीला  वेगवेगळ्या ठिकाणांहून २ महिलांचे मृतदेह आढळून आले. तृष्णा बिस्वास (वय २२ वर्षे) आणि रिया मोनी अख्तर अशी त्यांची नावे आहेत. यातील तृष्णा बिस्वास ही पटुआखली पोलीस ठाण्यात महिला पोलीस शिपाई होती. तिचा मृतदेह तिच्या कक्षामध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. ‘कौटुंबिक समस्या असल्यामुळे ती मानसिक तणावातून जात होती’, असे सांगितले जात आहे.

दुसरी घटना पटुआखली सरकारी महिला महाविद्यालयाच्या वसतीगृहात घडली, जिथे रिया मोनी अख्तर हिचा मृतदेह तिच्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळला. ती दुसर्‍या वर्षाची विद्यार्थिनी होती.

पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. प्रकरणांचे अन्वेषण चालू आहे. या घटनांमागे आत्महत्येची शक्यता वर्तवली जात आहे; परंतु पोलीस सर्व बाजूंनी या प्रकरणाचे अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका 

बांगलादेशात हिंदूंवर होणारी आक्रमणे पहाता याला आत्महत्या कसे म्हटले जात आहे ? पोलिसांनी याचे सखोल अन्वेषण केले पाहिजे !