वडिलांच्या रिव्हॉल्वरमधून स्वतःवर गोळ्या झाडल्या

मुंबई – मुंबई पोलीस दलातील हवालदार संतोष म्हस्के यांचा मुलगा हर्ष (वय २० वर्षे) याने वडिलांच्या रिव्हॉल्वरमधून स्वतःच्या डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केली. हर्षचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे; मात्र त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
संपादकीय भूमिकातरुण पिढीने आत्महत्येचे पाऊल उचलण्यामागे संयमाचा अभाव आणि दिशाहीनता हेच कारणीभूत ! |