बुटाच्या नाडीने गळफास घेऊन अल्पवयीन मुलीची आत्महत्या !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळेतील अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली. तिचा मृतदेह शाळेच्या प्रसाधनगृहात आढळून आला आहे. ती इयत्ता ११ वीत शिकत होती. तिने बुटाच्या नाडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ती गेल्या २ महिन्यांपासून नैराश्यात होती.

कराटे शिकवणीच्या वेळी ती प्रसाधनगृहात गेली; मात्र बराच वेळ होऊनही ती तेथून न परतल्याने प्रसाधनगृहाचा दरवाजा तोडण्यात आला. तेव्हा ही मुलगी गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आली. या प्रकरणी अन्वेषण चालू आहे.

संपादकीय भूमिका :

वारंवार होणार्‍या आत्महत्या पहाता तरुण पिढीचे मनोबल वाढवणे आवश्यक !