गंगावरम् येथे राममंदिरात घुसून धर्मांध ख्रिस्त्यांनी केली येशूला प्रार्थना !

ख्रिस्ती मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या आंध्रप्रदेशात ख्रिस्त्यांना धर्मांतरासाठी मोकळे रान मिळाल्याचे आरोप वारंवार होत आले आहेत. अशात त्यांच्याच पोलिसांकडून ‘अशी घटना घडलीच नाही’, असे म्हणत दावे फेटाळण्यात येणे, यात काय आश्‍चर्य ?

गुरुग्राम (हरियाणा) येथे मंदिरातील ९० वर्षीय पुजाऱ्याची हत्या !

भारतात अनेक राज्यांमध्ये पुजारी, संत आणि महंत यांच्या हत्या झाल्या आहेत. हिंदुबहुल देशात हिंदूंना धार्मिक मार्गदर्शन करणाऱ्यांची अशा प्रकारे हत्या होणे, हे लज्जास्पद !

काश्मीरमध्ये शारदादेवी मंदिराच्या उभारणीला आरंभ !

शेकडो वर्षांपासूनची तीर्थयात्रेची परंपरा पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न ! मंदिरांच्या उभारणीसमवेत त्यांचे कायमस्वरूपी रक्षण होण्यासाठी जिहादी आतंकवादाच्या विरोधात प्रभावी उपाययोजना आखणे आवश्यक आहे. यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावेत, असे हिंदूंना वाटते !

कर्नाटकमधील २ शाळांमध्ये श्री सरस्वतीदेवीच्या मूर्तींची तोडफोड !

या तोडफोडीमागे कुणाचा हात आहे, याचा शोध घेऊन संबंधितांना कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे परिवार देवतांच्या मंदिरांकडे अक्षम्य दुर्लक्ष ! – श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संरक्षण कृती समिती, श्रीक्षेत्र पंढरपूर

श्री विठ्ठल-रुक्मिणी यांसह सकल परिवार देवता याही भाविकांचे श्रद्धास्थान आहेत. त्यांच्या अशा अयोग्य स्थितीतील छायाचित्रांच्या माध्यमातून दुरवस्था आणि दुःस्थिती कशी आहे, ते कळेल. त्यामुळे सरकारीकरण झालेल्या मंदिर समितीचा भोंगळ कारभार सर्वांना कळेल !

(म्हणे) ‘मुसलमानांना व्यापार करण्याची अनुमती द्यावी !’ – मुसलमान व्यापारी संघटनेची मागणी

हिजाबविषयीच्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात व्यापार्‍यांनीही आंदोलन केल्याने त्यांना हिंदूंच्या जत्रांत व्यापार करण्यास बंदी !

नोएडा येथे शिवमंदिरात घुसून शिवलिंगाची तोडफोड

भाजपशासित उत्तरप्रदेशमध्ये हिंदूंच्या मंदिरावर आक्रमण होणे हिंदूंना अपेक्षित नाही !

गेली ४५ वर्षे बंद असलेले भीलवाडा (राजस्थान) येथील श्री देवनारायण मंदिर उघडण्यासाठी हिंदूंचा १७ किलोमीटर लांब मोर्चा !

वर्ष १९७७ मध्ये या मंदिराची भूमी वादग्रस्त असल्यावरून हे मंदिर न्यायालयाकडून बंद करण्यात आले होते. असे खटले प्रलंबित रहात असतील, तर न्याय कसा मिळणार ?

अमृतसर (पंजाब) येथे निहंग शिखांच्या वेशात आलेल्यांनी केली भगवान शिवाच्या मूर्तीची तोडफोड !

पंजाबमध्ये आता आम आदमी पक्षाचे सरकार आल्यानंतर हिंदूंवर आक्रमण होऊ लागणे, ही घटना भविष्यातील संकटाकडे लक्ष वेधत आहे. केंद्र सरकारने आतापासूनच पंजाबमधील हिंदूंच्या रक्षणासाठी प्रयत्न केले पाहिजेत !

श्री जोतिबा देवस्थान येथील मंदिराची चारही द्वारे खुली करण्याच्या आंदोलनास समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा पाठिंबा !

लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील श्री जोतिबा देवस्थान येथील मंदिरातील चारही द्वारे उघडून ‘ई-पास’ सुविधा बंद करावी, या मागणीसाठी जोतिबा डोंगर येथे ११ मार्चपासून धरणे आंदोलन चालू करण्यात आले आहे.