विठ्ठल मंदिराचे सरकारीकरण रहित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

नवी देहली – पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराचे सरकारीकरण रहित करण्यासाठी मी महाराष्ट्राच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे.

असे झाले नाही, तर मला हे प्रकरण न्यायालयात न्यावे लागेल, असे ट्वीट भाजपचे वरिष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी केले आहे.

संपादकीय भूमिका

डॉ. स्वामी यांचा अभिनंदनीय निर्णय ! सर्वच विठ्ठलभक्तांनी याचे समर्थन करावे !