हिंदु पुजार्‍याच्या नियुक्तीला राज्य मंत्रीमंडळाची संमती

कर्नाटकाच्या चिक्कमगळुरूमधील गुरु दत्तात्रेय पीठाच्या वादाचे प्रकरण !

चिक्कमगळुरू येथील दत्तपीठ हे भगवान दत्तात्रयाचे पवित्र स्थान आहे; मात्र मुसलमानांनी त्या जागेवर अतिक्रमण करून त्या जागेवर स्वतःचा दावा सांगितला आहे

बेंगळुरू – कर्नाटकाच्या चिक्कमगळुरू जिल्ह्यातील बाबा बुडनगिरी-दत्त पीठ प्रकरणी मंत्रीमंडळ उपसमितीने हिंदु पुजार्‍याच्या नियुक्तीची केलेली शिफारस राज्य मंत्रीमंडळाने स्वीकारली आहे, असे राज्याचे कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री जे.सी. माधुस्वामी यांनी सांगितले.

राज्याचे कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री जे.सी. माधुस्वामी

उपसमितीने सादर केलेला अहवाल उच्च न्यायालयासमोर ठेवण्यात येणार आहे. चिक्कमगळुरू येथील दत्तपीठ हे भगवान दत्तात्रयाचे पवित्र स्थान आहे; मात्र मुसलमानांनी त्या जागेवर अतिक्रमण करून त्या जागेवर स्वतःचा दावा सांगितला आहे. ही पवित्र भूमी हिंदूंना परत मिळण्यासाठी हिंदू वैध मार्गाने लढा देत आहेत.

१९ मार्च २०१८ या दिवशी कर्नाटक सरकारने एका आदेशाच्या द्वारे बाबा बुडनगिरी-दत्त पीठ या ठिकाणी पूजाविधी करण्यासाठी मौलवी (इस्लामचे धार्मिक नेते) सईद घोस मोहियुद्दीन शाह खद्री यांची नियुक्ती केली होती.

सरकारच्या या आदेशाला गुरु दत्तात्रेय पीठ देवस्थानने कर्नाटक उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. २८ सप्टेंबर २०२१ या दिवशी उच्च न्यायालयाने सरकारचा आदेश रहित केला होता.