संत ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज यांची तीर्थयात्रा
संत नामदेव म्हणू लागले, ‘‘मला माझा विठ्ठल डोळ्यांना दाखवा. इतरांशी मला काय करणे आहे ? तो पहावा, तो भेटावा, एवढीच माझी आस आहे.’’
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे २९ जूनला प्रस्थान
६ जुलैला माऊलींच्या पादुकांचे नीरा स्नान होईल. १४ जुलैला चांदोबाचा लिंब येथे उभे रिंगण, तर १२ जुलैला पुरंदवडे येथे पहिले गोल रिंगण होणार आहे.
माऊलींचे मानाचे अश्व आळंदीकडे मार्गस्थ !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासमवेत आषाढी वारीला जाण्यासाठी मानकरी शितोळे सरकार यांचे मानाचे अश्व शितोळे अंकली (कर्नाटक) येथून आळंदीकडे मार्गस्थ झाले आहेत.
पालखी प्रस्थानदिनी देऊळवाड्यामध्ये ५६ दिंड्यांतील प्रत्येकी ९० वारकर्यांनाच प्रवेश !
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यादिनी देऊळवाड्यामध्ये गर्दी होऊ नये, यासाठी दिंड्यातील ठराविक वारकर्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. ‘श्रीं’च्या रथापुढील २०, मागील २७ आणि ९ उपदिंड्या, अशा ५६ दिंड्यांतील प्रत्येकी ९० वारकर्यांना मंदिरामध्ये प्रवेश दिला जाणार आहे.
‘अवघाचि संसार सुखाचा करीन । आनंदे भरीन तिन्ही लोक ।।’, हे संत ज्ञानेश्वरांचे वचन सार्थ करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
ज्ञानेश्वर माऊलींप्रमाणे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेला रामराज्याचा संकल्प हा संपूर्ण सृष्टीसाठी आहे. त्यांच्यासारख्या अवताराचे कार्य हे केवळ मानवी जीवनापुरते मर्यादित नसून चराचर सृष्टीसाठी आहे तसेच त्यांच्या उदात्त विचारांची व्यापकता तिन्ही लोक व्यापून टाकणारी आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे २९ जूनला श्रीक्षेत्र आळंदीहून प्रस्थान !
पायी आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी परंपरेनुसार ज्येष्ठ कृष्ण अष्टमीला, म्हणजे २९ जून या दिवशी श्रीक्षेत्र आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान करेल. १७ जुलैला आषाढी एकादशी असून ही पालखी १६ जुलैला पंढरपूरला पोचेल.
आळंदी (पुणे) येथील ज्ञानेश्वर माऊलींच्या ‘सिद्धबेटा’तील सभागृहाची दुरवस्था !
सिद्धबेट येथे ‘राज्य तीर्थक्षेत्र विकास आराखड्या’तून लाखो रुपये व्यय करून वारकर्यांसाठी सभागृह बांधण्यात आले आहे; परंतु त्याचा वापर होत नसल्याने सर्वत्र अस्वच्छता, कचरा, धूळ, तसेच मद्याच्या रिकाम्या बाटल्याही येथे आढळल्या.या सभागृहाकडे आळंदी नगर परिषदेचेही दुर्लक्ष होत आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांचे उपासनास्थान सिद्धबेट (आळंदी) एक दुर्लक्षित ऊर्जास्रोत !
जगभरातून प्रतिवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात; परंतु आळंदीमध्येच ‘सिद्धबेट’ नावाचे एक लहानसे बेट आहे.
पूर्वीच्या संतांचा समृद्ध वारसा प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज चालवत आहेत ! – डॉ. नीलम गोर्हे, उपसभापती, विधान परिषद
त्या प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या ‘गीताभक्ती अमृत महोत्सवा’मध्ये त्या बोलत होत्या.