संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली । भागवत धर्माची पताका सर्वत्र फडकली ।।
‘श्रावण कृष्ण अष्टमी या दिवशी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांची जयंती आहे. त्यानिमित्त त्यांच्या पावन चरणी ही काव्यसुमनांजली भावपूर्णरित्या समर्पित करत आहे.
‘श्रावण कृष्ण अष्टमी या दिवशी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांची जयंती आहे. त्यानिमित्त त्यांच्या पावन चरणी ही काव्यसुमनांजली भावपूर्णरित्या समर्पित करत आहे.
या वेळी देवस्थानाचे विश्वस्त योगी निरंजनाथ, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष श्री. रवींद्र पाटील, महामंडलेश्वर जनार्दन हरि चैतन्यजी महाराज, गजानन महाराज लाहुडकर, गाडे कुटुंबीय, तसेच आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर आणि वारकरी भाविक उपस्थित होते.
आई-मुलाची नाळ आधुनिक वैद्य (डॉक्टर) तोडतात; पण ज्ञानेश्वर माऊलीची भक्तांशी असलेली नाळ कोणताही आधुनिक वैद्य तोडू शकत नाही; कारण ज्ञानेश्वर माऊलींचे माऊलीपण आत्मवस्तूने पुंजाळलेले (उजळलेले) आहे.
येथे ३० जुलैला सायंकाळी सवा ६ वाजता संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आळंदी नगर परिषद चौकात माऊलींच्या जयघोषात, वरुणराजाच्या उपस्थितीत आणि भक्तीमय वातावरणात स्वागत झाले.
बाजीराव विहीर येथे पार पडलेल्या या रिंगण सोहळ्यामध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या अश्वाने २ फेर्या मारल्यानंतर माऊलींच्या अश्वाच्या खुराने उधळलेली माती स्वत:च्या कपाळी लावण्यासाठी भाविकांनी गर्दी केली.
माऊलींच्या रथाजवळ अश्व आल्यावर सोहळाप्रमुखांनी अश्वास पुष्पहार घालून खारीक-खोबर्याचा नेवैद्य दाखवला. यानंतर अश्वाने दौड घेतली. पुढे माऊलींचा अश्व आणि मागे स्वारींचा अश्व अशी दौड पूर्ण झाली.
वारीच्या मार्गांमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना ३ वेळा स्नान घालण्यात येते. प्रथम आळंदीतून प्रस्थान होण्याआधी इंद्रायणी नदीमध्ये, दुसरे निरा नदीमध्ये, तर तिसरे स्नान पंढरपूरला पोचल्यानंतर चंद्रभागा नदीमध्ये घातले जाते.
जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, ‘‘पालखी मार्गावर शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी स्थानिक मंगल कार्यालये, उपाहारगृहे यांचे साहाय्य घेतले जाणार आहे. तात्पुरत्या शौचालयांचीही उभारणी करण्यात आली आहे.”
पालखी तळ नगरपालिकेकडून स्वच्छ करण्यात आला असून सासवड शहरही स्वच्छ केले आहे. रस्त्यांच्या दोन्ही बाजूस कापडाच्या झालरी लावून विद्युत् रोेषणाई केली आहे. माऊलींच्या पालखीचा जेथे विसावा असेल, त्या परिसरामध्येही विद्युत् रोषणाई केली आहे.
स्त्याच्या दुतर्फा थांबलेल्या लाखो भाविकांनी पालखी सोहळ्यांवर पुष्पवृष्टी करत, टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. २ जुलै या दिवशी पालखी पुणे येथून प्रस्थान करेल.