अलंकापुरीत जमला वैष्णवांचा मेळा; माऊलींच्या पालखी सोहळ्याचे आज होणार पंढरपूरकडे प्रस्थान !

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे ११ जून या दिवशी सायंकाळी ४ ते ६ च्या दरम्यान आळंदीतील देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. पालखी प्रस्थान सोहळा ‘याची देही याची डोळा’ अनुभवण्यासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यांतून छोट्या-मोठ्या दिंड्या अलंकापुरीत आल्या आहेत.

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान !

पालखी प्रस्थाननिमित्त देहूतील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात परंपरेप्रमाणे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेे. मंदिराची रंगरंगोटी, विविधरंगी पुष्प सजावट, आकर्षक विद्युत् रोषणाई करण्यात आली आहे.

पुणे येथे वारी सोहळ्‍यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्‍त !

देहू येथून १० जून या दिवशी जगद़्‍गुरु संत तुकाराम महाराज आणि ११ जून या दिवशी आळंदी येथून संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वर महाराज यांच्‍या पालखीचे प्रस्‍थान होणार आहे.

पालखी मार्गावरील अडथळे दूर करण्‍याची भाविक आणि नागरिक यांची मागणी !

अशी मागणी का करावी लागते ? संबंधित प्रशासकीय अधिकार्‍यांना दिसत नाही का ? पालखी मार्ग कायमचाच चांगला रहाण्‍यासाठी अधिकार्‍यांनी प्रयत्न करावेत.

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान ११ जून या दिवशी होणार !

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे श्रीक्षेत्र आळंदी येथून ११ जून या दिवशी प्रस्थान होणार आहे.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीवर चंदन उटीचा वापर करत शिंदेशाही साज !

आळंदी संस्थानच्या वतीने ही प्रथा परंपरा जपली जात असून पुणे येथील शिल्पकार अभिजित धोंडफळे यांनी ही उटी साकारली. या वेळी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिंदेशाही अवतार पहाण्यासाठी माऊली भक्तांनी गर्दी केली होती.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करणार ! – नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री

देहू, आळंदी, पंढरपूर ही महत्त्वपूर्ण तीर्थक्षेत्रे आहेत. हा भक्तीमार्ग उत्कृष्ट असावा. ज्ञानेश्वरीत उल्लेख असलेले वृक्ष लावण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.

संतांनी मराठी भाषा सुंदर ठेवली ! – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

संत ज्ञानेश्वरांपासून ते शिवकालीन संत जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, श्रीसमर्थ रामदासस्वामी, श्रीदासोपंत इत्यादी अगदी श्रीगोंदेकर, शेख महम्मदबाबांसह सगळ्या संतांनी आपली ही मराठी भाषा सुंदर ठेवली आणि साजरीगोजरी बनवली.

यंदा माऊलींच्या अश्वाचे गोल रिंगण सोहळ्याचे तप:पूर्ती वर्ष !

यंदा रिंगण सोहळ्याचे तप:पूर्ती वर्ष असल्याने उपस्थित दिंडी प्रमुख आणि पालखी प्रमुख यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. अधिकाधिक भाविकांनी या सोहळ्यास उपस्थित रहाण्याचे आवाहन वारकरी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. 

घराला सनातनचा आश्रम बनवणारे आणि घरासमोरील जागेत ‘राम कृष्ण हरि’, या आकारात फुलझाडे लावणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे नंदिहळ्ळी (बेळगाव) येथील श्री. उत्तम गुरव (वय ६१ वर्षे) !

‘प्रत्येक साधकाचे घर हे सनातनचा आश्रमच झाला पाहिजे.’ तसे आम्ही प्रयत्न करतो.