समर्पितभावाने गुरुकार्य करणार्या आणि सतत इतरांचा विचार करणार्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ !
‘ईश्वर आपल्या भक्तांचे त्रास स्वतःवर घेतो. ईश्वराला आपल्या मनातील गोष्ट, सुख-दुःख सांगितल्यानंतर आपले मन पूर्णतः शांत होते. ईश्वर सदैव आनंदात रहातो. माझा ईश्वर श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ आहेत. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना पाहिल्यावर आणि त्यांचे बोलणे ऐकल्यावर माझे मन प्रफुल्लित होते. त्यांच्या मुखातून निघालेले प्रत्येक वाक्य परम सत्य असते.