१. श्री. लहु यादव महारनोर (सचिव, धर्मरक्षक दल), पुणे, महाराष्ट्र.
अ. ‘आश्रमात पुष्कळ चैतन्य आहे.
आ. ‘आपल्या कुटुंबाला आश्रम दाखवण्यासाठी आणले पाहिजे’, असे मला वाटले.’
२. १०८ नीलकंठ शिवाचार्य स्वामीजी (मठाधिकारी, श्री धारेश्वर मठ), धारेश्वर, पाटण, जिल्हा सातारा, महाराष्ट्र.
अ. ‘मला अतिशय समाधान वाटले.
आ. येथील स्वच्छता, सुसूत्रता, शांतता आणि साधकांची नम्रता पाहून मला अत्यानंद झाला.’
३. श्री. तरुण मंडल (कार्यकर्ता, महाभारत संघ), कोलकाता
अ. ‘पुष्कळ चांगले वाटले. आनंद झाला.
आ. कुटुंबियांना समवेत घेऊन येऊ. अधिकाधिक लोकांना घेऊन येऊ.’
४. श्री. गौरी शंकर शॉ (कार्यकर्ता, महाभारत संघ), आरामबाग, हुगळी, बंगाल.
अ. ‘मन तृप्त झाले.
आ. आश्रमात आल्यावर मन प्रफुल्लित झाले.
इ. मनाला पुष्कळ शांती लाभली.’
५. श्री. दिनेशजी हिराणी (श्री शिवधारा मिशन फाऊंडेशन), अमरावती, महाराष्ट्र.
अ. ‘पुष्कळ सकारात्मकता लाभली.
आ. अद्भुत असे अवर्णनीय सुख मिळाले.’
६. अधिवक्ता धीरेंद्र श्रीवास्तव (उच्च न्यायालय), प्रयागराज, उत्तरप्रदेश
अ. ‘आश्रम पुष्कळ सुंदर आहे.
आ. येथे मन रमते. मनाला पुष्कळ शांती लाभते.’
आश्रमातील सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून मान्यवरांनी दिलेले अभिप्राय
१. श्री. लहु यादव महारनोर (सचिव, धर्मरक्षक दल), पुणे, महाराष्ट्र.
अ. ‘प्रदर्शन पाहिल्यावर ‘साधना केली पाहिजे’, असे मला वाटले.’
२. १०८ नीलकंठ शिवाचार्य स्वामीजी (मठाधिकारी, श्री धारेश्वर मठ), धारेश्वर, पाटण, जिल्हा सातारा, महाराष्ट्र.
अ. ‘सर्वांमध्ये ईश्वर आहे. अदृश्य शक्तीची दुसरी बाजू ‘ॐ’कारस्वरूप असते’, याचा मला अनुभव आला.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : २५.६.२०२४)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |