‘एकदा आम्हाला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. ‘बौद्धिक सेवेतून आनंद केव्हा मिळतो ?’, असा विषय एका साधिकेने मांडल्यावर माझ्या मनात पुढील विचार आले. ‘बौद्धिक सेवा ही बुद्धीच्या स्तरावर असते. ती परिपूर्ण झाल्यास परिणामकारक होऊन साधकाला आनंद मिळतो’, असे मला वाटले. त्यानंतर मी सत्संगात बौद्धिक सेवेविषयी मला सुचलेली सूत्रे मांडली. ती सूत्रे येथे दिली आहेत.

१. ‘बौद्धिक सेवेतून साधकाची साधना कशी होते ?’, याविषयी सौ. भोसले यांना स्फुरलेले विचार
अ. बौद्धिक सेवेमध्ये परिपूर्णता येते. तेव्हा तिच्यातून साधना होते.
आ. साधना होऊ लागली की, बुद्धीतील रुक्षपणा निघून जाऊन ती दुसर्याच्या हृदयाला जाऊन भिडते.
इ. त्या सेवेतील विचारांची व्यापकता साधकाला जाणवते. तेव्हा ती सेवा ईश्वराच्या विश्वबुद्धीशी जोडली जाते.
ई. ‘परिपूर्णता, व्यापकता आणि हृदयस्पर्शी अनुभूती देणे’, हे सर्व ईश्वराचे गुण आहेत. ते बौद्धिक सेवेत उतरतात. तेव्हा साधकाला सच्चिदानंदस्वरूप ईश्वराचा आनंद मिळतो.
२. भाषांतराची सेवा करतांना सौ. भोसले यांना जाणवलेल्या आनंदाची सूत्रे
‘मी ग्रंथ विभागात सेवा करते. मागील ४ – ५ वर्षे मी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवातील’ वक्त्यांची हिंदी भाषेतील भाषणे मराठी भाषेत भाषांतर करण्याची सेवा करत आहे. बरेचसे हिंदुत्वनिष्ठ हे हिंदुत्वाचे निष्ठावान (सच्चे) कार्यकर्ते आहेत; पण भाषेच्या अडचणीमुळे त्यांना त्यांच्या भावना योग्य शब्दांत मांडता येत नाहीत. त्यामुळे त्यांची भाषणे भाषांतर करण्यास अडचण येते, तरीही या सेवेची मी आतुरतेने वाट पहात असते. ही सेवा करतांना मला पुढील सूत्रे जाणवली.
अ. प्रतिवर्षी ही सेवा करतांना माझी या सेवेतील विषयांशी एकरूपता वाढत गेली.
आ. ‘वक्त्याला नक्की कोणता संदेश लोकांपर्यंत पोचवायचा आहे ?’, याचे मला आकलन होऊ लागले आणि मी तशा शब्दांत ते मांडू लागले.
इ. भाषांतर करतांना वक्त्यांमधील क्षात्रभाव, धर्मप्रेम आणि जाज्वल्य धर्मनिष्ठा हे गुण माझ्या हृदयाला स्पर्श करत होते. त्यामुळे मी तो तो भाव भाषांतरात शब्दबद्ध करू लागले.
ई. हिंदुत्वनिष्ठांच्या प्रत्येक भाषणातून ‘भारतामध्ये कोणत्या प्रांतात हिंदूंच्या कोणत्या समस्या आहेत ?’, ते मला नेमकेपणाने कळू लागले.
उ. हिंदुत्वाचे निष्ठावान (सच्चे) कार्यकर्ते असल्यामुळे ‘प्रत्यक्ष हिंदुत्व रक्षणाचे कार्य करत असतांना त्यांना कुणाकडून आणि कशा प्रकारच्या अडचणी येतात ?’, त्याचे बारकावे माझ्या लक्षात येतात.
ऊ. ‘हिंदुत्वनिष्ठांनी त्यांच्या समस्येवर आपल्या परीने कोणती उपाययोजना काढली आहे ? त्यांना त्यात कसे यश लाभले आहे ?’, हे मला समजते.
ए. सर्वांत शेवटी हिंदुत्वनिष्ठांच्या लक्षात येते, ‘हे हिंदुत्वाचे कार्य फार व्यापक आहे. त्यामुळे त्यात सर्व हिंदूंचे सहकार्य असणे आवश्यक आहे.’ त्यासाठी ते ‘सर्व हिंदुत्वनिष्ठांनी आपल्याला साहाय्य करावे’, असे आवाहन कळकळीने करतात.
३. भाषांतराची सेवा करतांना हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदु धर्म यांच्यापुढील समस्यांसंदर्भात शिकायला मिळालेली सूत्रे
अ. ‘आज जगातील हिंदूंसमोर अनेक प्रकारच्या समस्या उभ्या ठाकलेल्या आहेत. ‘त्या सर्व समस्यांसाठी ‘हिंदु राष्ट्र’ हेच एकमेव उत्तर आहे’, ही गोष्ट सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी फार पूर्वीच ओळखली आहे.
आ. ‘हिंदूंच्या प्रत्येक समस्येचे उत्तर ‘हिंदु राष्ट्र’ हेच असल्यामुळे हिंदु राष्ट्र लवकरात लवकर येणे किती आवश्यक आहे ?’, याची सर्व हिंदुत्वनिष्ठांना आतून जाणीव होते. त्यानंतर ‘जयतु जयतु हिंदु राष्ट्रम् ।’ या जयघोषाने सभागृह दणाणते आणि तो जयघोष प्रत्येक हिंदुत्वनिष्ठांच्या हृदयावर कोरला जातो. तो जयघोष वर्षभर त्याच्या कानात घुमत राहून त्याला कार्य करायला प्रेरणा देत रहातो.
इ. हिंदुत्वनिष्ठांना रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमाचे दर्शन जवळून घडल्यामुळे ते स्वतः येथील चैतन्यदायी वातावरण अनुभवतात. सनातनचा आश्रम हा हिंदु राष्ट्राचा एक बालेकिल्लाच आहे. हिंदुत्वनिष्ठांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची प्रीती लाभते.
ई. या सर्व गोष्टींमुळे हिंदुत्वनिष्ठ अक्षरशः गुरुदेव आणि साधक यांच्या प्रेमाने चिंब भिजून जातात. अधिवेशन संपल्यानंतरही त्यांचा पाय तेथून निघत नसतो; परंतु त्यांचे कार्यक्षेत्र त्यांना साद घालत असते. ‘पुढील वर्षी आणखी हिंदुत्वाचे कार्य करून येथे यायचे’, या प्रेरणेने (उमेदीने) ते दिव्य आठवणींची शिदोरी घेऊन जातात. आपल्या क्षेत्रांत जाऊन तेथे आणखी अधिक जोमाने हिंदुत्वाचे कार्य करतात.
उ. ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात’ म्हणजे भारतातील सर्वांत मोठ्या ‘हिंदू व्यासपिठा’वर आपल्याला बोलण्याची अमोल संधी मिळाली’, याविषयी हिंदुत्वनिष्ठ कृतज्ञताभाव व्यक्त करतात. ते पाहून माझे मन अक्षरशः हेलावून जाते. ‘त्यानंतर माझेही मन कधी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी शरणागत होऊन कोटीशः कृतज्ञता व्यक्त करू लागते’, ते मलाही कळत नाही.’
– गुरुचरणी समर्पित,
सौ. कस्तुरी भोसले (वय ७० वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.२.२०२५)