Gujarat Factory Blast : गुजरातमध्ये बॉयलरचा स्फोट : १७ जणांचा मृत्यू

बनासकांठा (गुजरात) – येथील फटाक्याच्या कारखान्यात बॉयलरच्या झालेल्या स्फोटात १७ कामगारांचा मृत्यू झाला, तर ३ जण गंभीररित्या घायाळ झाले. स्फोटामुळे कारखान्यात आग लागली. कारखान्यात काम करणारे कामगार त्यात अडकले. आतापर्यंत ७ कामगारांचे मृतदेह सापडले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो.