सातारा, ११ मार्च (वार्ता.) – पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर ९ मार्चाला ट्रक आणि चारचाकी यांच्या अपघातात २ महिलांचा मृत्यू झाला. त्याला आनेवाडी पथकर नाका प्रशासन, तसेच महामार्ग पोलीस उत्तरदायी आहेत. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे नोंदवाववेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य बस, ट्रक, टेंपो, वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष प्रकाश गवळी यांनी केली. ते म्हणाले, ‘‘महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी पथकर नाक्यांना क्रेन, रुग्णवाहिका अशा साधनांसह शासनाने निधी दिलेला असतो. ट्रक किंवा वाहन महामार्गावर बंद पडल्यास क्रेन पाठवून वाहतूक सुरळीत करणे आवश्यक असते. ९ मार्च या दिवशी सकाळी ६ वाजता ट्रक बंद पडला. तेथे क्रेन पाठवून ट्रक बाजूला करणे आवश्यक होते; मात्र पथकर नाका प्रशासनाने तसे केले नाही. महामार्ग पोलिसांनी गुन्हे नोंदवले. यामुळे पथकर नाका प्रशासन आणि पोलीस यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी.’’
संपादकीय भूमिकासुस्त प्रशासनाला जागे करण्यासाठी संबंधितांना कठोर शिक्षा होणे आवश्यक ! |