
मुंबई, ११ मार्च (वार्ता.) – ‘ए.आय.’च्या (कृत्रिम बुद्धीमत्ता) साहाय्याने मद्य (अल्कोहोल) आणि अमली पदार्थ सेवन करून गाडी चालवणार्यांची पडताळणी करण्यात येणार आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण न्यून करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार काशिनाथ दाते यांनी ‘राज्यातील रस्ते अपघातांच्या प्रमाणांमध्ये वाढ’ याविषयी तारांकित प्रश्न मांडला होता. त्यावर परिवहनमंत्री बोलत होते.
परिवहनमंत्री म्हणाले,…
१. वाहन चालवण्याचा परवाना देतांना ३८ ‘ऑटोमेटिक टेस्ट’ (स्वयंचलित चाचण्या) करण्यात येतात. त्यामध्ये ७० टक्के परीक्षार्थी अनुत्तीर्ण होतात. यामुळे अपघातांचे प्रमाण अल्प होत आहे.
२. जो निधी ज्या कामांसाठी देण्यात येतो, त्याच कामासाठी वापर करण्यात येईल. अपघातांमध्ये मृत्यू झालेल्यांच्या वारसांना १० लाख रुपये देण्यात येतात.
३. राज्यातील अपघातप्रवण ठिकाणांची पडताळणी वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि परिवहन विभाग यांकडून संयुक्तपणे करण्याचा विचार करू.