
नवी देहली – ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे विश्वस्त आणि माजी आमदार कामेश्वर चौपाल (वय ६८ वर्षे) यांचे ७ फेब्रुवारी या दिवशी येथील गंगाराम रुग्णालयात निधन झाले. आजारी असल्याने गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर येथे उपचार चालू होते. कामेश्वर चौपाल रामजन्मभूमी आंदोलनाचे पहिले कारसेवक (राममंदिरासाठी आंदोलन करणारे) होते. त्यांनीच अयोध्येत श्रीराममंदिराच्या उभारणीची पहिली वीट रचली होती. त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ‘प्रथम कारसेवक’ हा दर्जा दिला होता. कामेश्वर चौपाल हे राजकारणात येण्यापूर्वी विहिंपचे सहसचिव होते, तसेच भाजपचे ते बिहार प्रदेश सरचिटणीसही होते.