चेंगराचेंगरीचा कट असल्याचा पोलिसांना संशय
अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथील श्रीराममंदिराच्या ठिकाणी उडणारे ड्रोन ड्रोनविरोधी यंत्रणेद्वारे पाडण्यात आले. ही घटना १७ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी प्रवेशद्वार क्रमांक ३ च्या ठिकाणी घडली. या वेळी येथे मोठी गर्दी होती. ड्रोन पाडल्यानंतर बाँब शोधक आणि नाशक पथकाला पाचारण करण्यात आले. ड्रोनची तपासणी करण्यात आली. ड्रोन उडवणार्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. श्रीराममंदिर परिसरात ड्रोन उडवण्यास मनाई आहे. मंदिरावरून विमानांनाही उड्डाण करण्याची अनुमती नाही. पोलिसांना संशय आहे की, हा चेंगराचेंगरी घडवण्याचा कट असू शकतो.