नववर्षाचा संकल्प !

येत्या नववर्षाच्या भीषणतेमध्ये तरून जाण्यासाठी प्रभु श्रीरामचंद्राला शरण जावे लागेल. तशी भक्ती निर्माण करण्याचा प्रयत्न या नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून करावा लागेल. ‘न मे भक्तः प्रणश्यति ।’ असे भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे. त्यामुळे भक्त बनून स्वतःचे, समाजाचे आणि देशाचे रक्षण करा !

श्रीराममंदिरासाठी आवश्यकतेपेक्षा दुप्पट रक्कम गोळा झाल्याने घरोघरी जाऊन देणगी गोळा करणे बंद !

मंदिराला लागणार्‍या पैशांपेक्षा अधिक गोळा झालेल्या रकमेचा व्यय देशातील जीर्णावस्थेत असलेल्या प्राचीन आणि मोठ्या मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी करावा, तसेच हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाठी धर्मशिक्षण देणारी केंद्रे उघडावीत, असेच हिंदूंना वाटते !

श्रीराममंदिर ७० नाही, तर १०७ एकरमध्ये उभारण्यात येणार !

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने मूळ ७० एकर भूमीच्या शेजारील भूमी विकत घेतली आहे.

उत्तरप्रदेश सरकारच्या अर्थसंकल्पात अयोध्येसाठी ४०४, तर काशीसाठी १०० कोटी रुपयांची तरतूद

श्रीरामजन्मभूमी मंदिरापर्यंत पोचण्यापर्यंतच्या मार्गासाठी ३०० कोटी, तर अयोध्येच्या विकासासाठी १०४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याखेरीज काशीमध्ये पर्यटन विकासासाठी १०० कोटी रुपये व्यय करण्यात येणार आहे.

बनावट पावतीद्वारे श्रीराम मंदिर निधी संकलन करणार्‍याच्या विरोधात जळगाव येथे गुन्हा नोंद !

श्रीराम मंदिर निधी संकलन अभियान पूर्ण झाले असूनही निधी संकलनासाठी बनावट पावती पुस्तक सिद्ध करून पैसे गोळा करणार्‍या भामट्याला नागरिकांनी चांगलाच चोप देत शहर पोलिसांच्या कह्यात दिले. तसेच त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला.

रिंकू शर्मा यांची हत्या करणार्‍या जिहादी आक्रमणकर्त्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्या !

जिहाद्यांनी रिंकू शर्माची क्रूर हत्या केली. पोलिसांच्या ढिसाळ कारभारामुळे हा भयानक प्रकार घडला आहे.

रिंकू शर्मा यांच्या मारेकर्‍यांना फाशीची शिक्षा द्या ! – विश्‍व हिंदु परिषद, बजरंग दलाचे मोर्चाद्वारे निवेदन

रिंकू शर्मा यांच्या हत्येत गुंतलेल्या आक्रमणकर्त्यांवर रासुका लावून त्यांना फाशी देण्यात यावी.

राज ठाकरे यांच्या अयोध्या दौर्‍यामुळे हिंदुत्वाच्या भूमिकेला बळकटी मिळेल ! – प्रवीण दरेकर

मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजप आणि मनसे युती करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. यावर दरेकर म्हणाले की, युती ही समविचारी घटकांची होत असते. हिंदुत्वाची भूमिका त्यांनी घेतली, तर हिंदुत्ववादी विचारांचे पक्ष आणि संघटना यांना एकत्र येण्यास निश्‍चितपणे चांगले वातावरण निर्माण होईल.

प्रभु श्रीराम म्हणजे राष्ट्रदेव ! – भगतसिंग कोश्यारी, राज्यपाल

प्रभु श्रीराम हे हिमालयाप्रमाणे धैर्यवान, तर सागराप्रमाणे गंभीर आहेत. राष्ट्राला एकसंध बांधण्याचे काम प्रभु श्रीरामांनी केले आहे. ते केवळ श्रीराम नाहीत, तर आपल्या सर्वांसाठी राष्ट्र आहेत, तसेच ते आपले राष्ट्रदेव आहेत, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी १५ जानेवारी या दिवशी येथे केले.

अयोध्या येथील राममंदिर उभारणीसाठी निधी समर्पण अभियान ! – मिलिंद परांडे, विश्‍व हिंदु परिषद

श्रीराम जन्मभूमीवर भव्य मंदिराचे कार्य आता गतिमान झाले आहे.