Ayodhya Diwali 2024 : अयोध्येतील श्रीराममंदिराच्या निर्मितीनंतर पहिल्या दिवाळीला प्रारंभ

  • श्रीराममंदिर फुलांनी सजवले

  • श्रीराममंदिर परिसरात दिव्यांची रोषणाई

  • शरयू घाटांवर लावण्यात येणार २८ लाख पणत्या

अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथील श्रीरामजन्मभूमीवर भव्य श्रीराममंदिराची उभारणी झाल्यानंतरची पहिली दिवाळी साजरी होत आहे. या निमित्ताने या परिसरात रोषणाई करण्यात आली आहे. तसेच येथील शरयू नदीच्या तटावर असणार्‍या राम की पौडी येथे प्रतिदिन २८ लाख पणत्या लावण्यात येणार आहेत. ५५ घाटांवर दिवे लावले जात आहेत. ३० ऑक्टोबरपासूनच याला प्रारंभ झाला आहे. तसेच येथे ‘लेझर शो’चेही आयोजन करण्यात आले आहे. या दीपोत्सवासाठी मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ उपस्थित रहाणार आहेत.

३० ऑक्टोबरपासूनच रस्त्यांवर ठिकठिकाणी चित्ररथ दाखवण्यात येत आहेत. यात उत्तरप्रदेशासह देशातील अन्य राज्यांतील कलाकार त्यांची कला सादर करत आहेत. श्रीराममंदिरासमोर मोठी रांगोळी काढण्यात आली आहे. यामध्ये रंगांचा नाही, तर फुलांचा वापर करण्यात आला आहे.

कलाकार त्यांची कला सादर करताना