केरळमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या हत्येच्या प्रकरणी माकपच्या ११ कार्यकर्त्यांना जन्मठेप

६ मार्च २००८ या दिवशी झालेल्या भाजपचे कार्यकर्ते महेश यांच्या हत्येच्या प्रकरणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ११ कार्यकर्त्यांना येथील सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

यवतमाळ येथे बाल लैंगिक अत्याचारप्रकरणी धर्मांधाला शिक्षा

बाल लैंगिक अत्याचारप्रकरणी नुकतेच यवतमाळ न्यायालयाने आरोपी शेर खान समशेर खान पठाण याला ३ मास सक्तमजुरीची शिक्षा सुनावली, तर ५ सहस्र रुपये दंड ठोठावला आहे.

वाहतूक पोलिसाला मारहाण करणार्‍या युवकाला १ वर्ष कारावासाची शिक्षा

रिक्शाचालकासमवेत वाद घालू नको, असे सांगणारे वाहतूक शाखेचे हवालदार श्री. सुनील जाधव यांना मारहाण करून घायाळ करणार्‍या आकाश चव्हाण याला प्रथम जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्री. खोसे यांनी १ वर्ष कारावास आणि ५०० रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.

इंडोनेशियात वर्ष २०१६ मध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणाच्या प्रकरणी मौलानाला फाशीची शिक्षा

इंडोनेशियाच्या स्टार बक्स कॅफेत वर्ष २०१६ मध्ये झालेल्या आत्मघाती आक्रमणाच्या प्रकरणी मौलाना अमान अब्दुर रहमान याला स्थानिक न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे.

फ्रान्सिस परेरा याला दक्षिण गोव्यातून बहिष्कृत करण्याच्या मागणीवर जिल्हा दंडाधिकारी निर्णय देणार

गोव्यात विविध धार्मिक स्थळांची तोडफोड केल्याचा आरोप असलेला फ्रान्सिस परेरा याला दक्षिण गोव्यातून बहिष्कृत करण्याविषयीच्या गोवा पोलिसांच्या मागणीवर …….

इजिप्तच्या ‘मुस्लिम ब्रदरहुड’च्या ११ जणांना फाशीची शिक्षा

इजिप्तच्या न्यायालयाने बंदी घातलेल्या ‘मुस्लिम ब्रदरहुड’ संघटनेच्या ११ जणांना फाशीची शिक्षा ठोठावली आहे. वर्ष २००३ मध्ये पोलिसांच्या वाहनावर आक्रमण करून पोलिसांची हत्या केल्याच्या आरोपप्रकरणी त्यांना दोषी ठरवून ही शिक्षा देण्यात आली आहे.

यापुढे सामाजिक प्रसारमाध्यमांवरील आक्षेपार्ह पोस्ट पुढे पाठवल्यास कारवाईची शक्यता

पोस्ट चुकून टाकली, अजाणतेपणी पुढे पाठवली (फॉरवर्ड केली), आक्षेपार्ह असल्याचे लक्षात येताच काढून टाकली, तरीही ‘पोस्ट’ पाठवणारा अडचणीत येऊ शकतो. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच देशातील सर्व जिल्ह्यांत सामाजिक प्रसारमाध्यमांवर (सोशल मीडिया) लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणा उभी करण्याचा निर्णय घेतला आहे.

नेपाळमध्ये गोहत्या करणार्‍याला १२ वर्षांची शिक्षा

नेपाळमध्ये राष्ट्रीय पशू असणार्‍या गायीची हत्या केल्याच्या प्रकरणी यम बहादुर खत्री याला १२ वर्षांची शिक्षा ठोठावली.

इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांच्या ४० पत्नींना इराकच्या न्यायालयाने १० मिनिटांत फाशीची शिक्षा ठोठावली !

देशातून इस्लामिक स्टेटचा (‘आयएस्’चा) नायनाट केल्यावर इराक सरकार आतंकवादी, त्यांचे कुटुंबीय आणि समर्थक यांना शोधून त्यांना शिक्षा करत आहे.

१० सहस्र रुपयांची लाच घेणार्‍याला ६ मास कारावासाची शिक्षा

वीज देयकाची वसुली न करण्यासाठी १० सहस्र रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक केलेला आरोपी चंपालाल रावल याला ६ मासांचा कारावास आणि ५ सहस्र रुपये दंड अशी शिक्षा न्यायालयाने ठोठावली.


Multi Language |Offline reading | PDF