पाकिस्‍तानचा माजी क्रिकेटपटू खालिद लतीफ याला १२ वर्षांची शिक्षा !

नेदरलँड्‍सचे खासदार गीर्ट विल्‍डर्स यांना मारण्‍यासाठी चिथावणी दिल्‍याचे प्रकरण

खालिद लतीफ

अ‍ॅमस्‍टरडॅम – पाकिस्‍तानचा माजी क्रिकेटपटू खालिद लतीफ याला नेदरलँडमधील एका न्‍यायालयाने १२ वर्षांच्‍या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. असे असले, तरी लतीफ ही शिक्षा भोगणार नाही; कारण तो पाकिस्‍तानात वास्‍तव्‍याला असून या प्रकरणाची सुनावणी नेदरलँड्‍समध्‍ये झाली. विल्‍डर्स यांनी प्रेषित महंमद पैगंबर यांच्‍याविषयी व्‍यंगचित्र स्‍पर्धा आयेजित करण्‍याची घोषणा केली होती. त्‍यामुळे विल्‍डर्स यांना जो कुणी ठार मारेल, त्‍याला ३० लाख रुपये बक्षीस देण्‍याची घोषणा लतीफ याने पाकिस्‍तानात केली होती. याचा व्‍हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला होता. या प्रकरणी विल्‍डर्स यांनी नेदरलँड्‍समध्‍ये लतीफ याच्‍या विरोधात तक्रार केल्‍यानंतर या खटल्‍याची सुनावणी न्‍यायालयात झाली. न्‍यायालयाने म्‍हटले आहे की, लतीफ याने विल्‍डर्स यांना केवळ धमकीच दिली नाही, तर त्‍यांच्‍या अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्यावरही आक्रमण केले.

संपादकीय भूमिका 

नेदरलँड्‍स येथील न्‍यायालयाने शिक्षा दिल्‍याने आणि लतीफ पाकिस्‍तानात असल्‍याने शिक्षा केवळ कागदावरच !