सामूहिक बलात्कार आणि हत्या केल्याच्या प्रकरणी ३ धर्मांधांना फाशीची शिक्षा  

नवी देहली – वर्ष २०१५ मध्ये एका महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिची आणि तिच्या २ मुली यांची हत्या केल्याच्या प्रकरणी येथील तीस हजारी न्यायालयाने महंमद अक्रम, शाहीद आणि रफत अली उपाख्य मंजूर अली यांना फाशीची शिक्षा सुनावली.

(८ वर्षांनी अशा प्रकारच्या गुन्ह्यांत शिक्षा होणे, हा अन्यायच म्हणावा लागेल ! इतक्या गंभीर गुन्ह्यांची सुनावणी तत्परतेने होणे आवश्यक आहे ! – संपादक) ज्या महिलेची हत्या करण्यात आली, तिला महंमद अक्रम हा ‘बहीण’ मानत होता. (धर्मांधांना कोणतेही नाते नसते आणि ते अशा प्रकारचे अनैतिक कृत्य करतात, याचेच हे एक उदाहरण ! – संपादक) या तिघांनी तिच्या २ लहान मुलांची गळा दाबून हत्या केली होती.

संपादकीय भूमिका

अशा प्रत्येक गुन्ह्यांमध्ये फाशीचीच शिक्षा होऊ लागली, तर असे कृत्य करू पहाणार्‍यांवर वचक बसेल !