मंचर (पुणे) शहरामध्ये नागरिकांसाठी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचे विनामूल्य आयोजन केले !

येथील आंबेगाव तालुक्यातील नागरिकांसाठी ४ एप्रिलला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाचे विनामूल्य आयोजन करण्यात आले होते. हे आयोजन जनसेवक श्री. संजय भाऊ थोरात यांनी केले होते.

जिवंत खेकडा दोरीने बांधून दाखवल्याप्रकरणी आमदार रोहित पवार यांच्यावर कारवाई करा !

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये प्रतिकात्मक म्हणून ‘जिवंत खेकडा’ दोरीने बांधून दाखवला होता. खेकड्याचा चुकीचा वापर केल्याविषयी ‘पेटा इंडिया’ या संस्थेने आक्षेप घेतला आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अवजड वाहनांना ९ एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत बंदी  !

सध्या आलेल्या उष्णतेच्या लाटेच्या दुष्परिणामांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अवजड वाहनांना ९ एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत ३ दिवस बंदी घालण्यात आली आहे.

पाणीपट्टीच्या थकबाकी वसुलीसाठी नळजोडणी खंडित केल्याने विक्रमी पाणीपट्टीची वसुली !

पाणीपट्टीच्या थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने गेल्या ६ महिन्यांत अनुमाने ३०० नळजोडण्या खंडित केल्या. त्यामुळे अनेक वर्षांपासून असलेल्या थकबाकी वसुलीसह ३१ मार्चपर्यंत ७८ कोटी ५८ लाख रुपये विक्रमी ..

मॅफेड्रॉन बाळगल्याच्या प्रकरणी अमली पदार्थविरोधी पथकाकडून पुणे येथे २ धर्मांधांना अटक !

आरोपी इस्तियाक आणि अब्दुल करीम हे दोघे १६ ग्रॅम वजनाचे मेफेड्रॉन विक्रीसाठी मोई गावातील भैरवनाथनगर येथे आले होते. त्यांच्याकडून मॅफेड्रॉन आणि ३ भ्रमणभाष असा एकूण ३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

शैक्षणिक शुल्क परत मिळावे, म्हणून पालकांचा चिंचवड (पुणे) पोलीस आयुक्तालयातील अधिकार्‍यांना घेराव !

पोलिसांनी टोलवाटोलवीची उत्तरे देणे म्हणजेच पीडित पालकांवर अजून अन्याय करण्यासारखे नाही का ?

पुणे शहरातील टँकरचालकाने पैशांची मागणी केल्यास तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध !

तक्रारींवर काय उपाययोजना केली ? याचे स्पष्टीकरण प्रशासनाने द्यावे !

पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर असलेल्या मजारीवर कारवाई करण्याची मागणी !

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच मजार बांधण्याचे धर्मांधांचे साहस होतेच कसे ? ही बेकायदेशीर मजार बांधण्यात येईपर्यंत प्रशासन झोपले होते का ?

कोरेगाव भीमा प्रकरणातील आरोपी शोमा सेन यांना जामीन

‘सेन यांनी बराच मोठा कालावधी कारागृहात घालवला आहे. त्यांचे वय बघता त्यांना जामीन मिळवण्याचा हक्क आहे’, असे मत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देतांना नोंदवले.

आचारसंहितेच्या काळात ‘मेट्रो’च्या खांबांवरील विज्ञापनांवर कारवाई करा !

‘मेट्रो’च्या मार्गांवरील खांब तुमच्या मालकीचे असून त्यावर आचारसंहितेचा भंग होईल, असे कोणतेही विज्ञापन करू देऊ नका. विज्ञापन लावल्यास तात्काळ कारवाई करा, अशा आशयाचे पत्र पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आकाशचिन्ह आणि परवाना विभागाकडून ‘महामेट्रो’ प्राधिकरणाला देण्यात आले आहे.