पुणे शहराला अवकाळी पावसाचा फटका

शहरात ११ ठिकाणी झाडपडीच्या घटना !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांसह जिल्ह्याच्या बहुतांश भागात ३ एप्रिलला विजांच्या कडकडाटांसह अवकाळी पाऊस पडला. यामुळे शहरात ११ ठिकाणी झाड पडण्याच्या घटना घडल्या. यात एक व्यक्ती घायाळ झाला, तर २ चारचाकींची हानी झाली. पुणे शहरात १८.५ मि.मी., तर पिंपरी-चिंचवडमध्ये तासाभरात ७ मि.मी. पावसाची नोंद झाली. यामुळे कांदा आणि द्राक्ष यांची मोठी हानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे शहराला अवकाळी पावसाचा फटका बसला. पावसाचा जोर ग्रामीण भागात अल्प होता. बारामती शहर आणि तालुका, इंदापूरचा पश्चिम भाग, पुरंदरच्या काही भागांतही अवकाळी पाऊस पडला.