महापालिकेच्या तिजोरीत चालू आर्थिक वर्षात ७ सहस्र ४६३ कोटींचा कर जमा !

बांधकाम शुल्कातून २ सहस्र २०० कोटी ८९ लाख रुपये, तर मिळकत करापोटी २ सहस्र १९१ कोटी ७५ लाख रुपये जमा झाले आहेत.

‘छत्रपती शिवराय समजून घेतांना’ या पुस्तकाचे पिंपरी येथे लोकार्पण !

मागील काही वर्षे शिवरायांच्या इतिहासात असत्य गोष्टी घुसवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांना उत्तरे देण्याचे काम पुस्तकाद्वारे केले आहे. ऐतिहासिक कागदपत्रांचा आधार घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मनिष्ठ धोरण प्रकाशात आणण्याचे काम या पुस्तकाद्वारे केले आहे.

श्री ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी आळंदी-पंढरपूर पालखी सोहळ्याच्या प्रमुखपदी योगी निरंजन नाथ यांची निवड !

श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीमधील सर्व विश्वस्तांची मासिक बैठक  येथील कार्यालयात पार पडली. या बैठकीत वर्ष २०२४ च्या आषाढी वारी आळंदी-पंढरपूर पालखी सोहळ्याच्या प्रमुखपदी..

पुणे येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रथमोपचार शिबिराला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

चिंचवड येथील गोखले सभागृहामध्ये ‘आपत्काळासाठी संजीवनी असणारा प्रथमोपचार’ शिकण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विनामूल्य प्रथमोपचार शिबिराचे आयोजन केले होते.

पवना नदीत राडारोडा टाकणार्‍यांविरोधात गुन्हा नोंद !

केवळ गुन्हे नोंद करून न थांबता त्यांना कठोर शिक्षा देणे आवश्यक !

संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा संकुलातील नवीन सिद्ध केलेला कृत्रिम धावमार्ग केवळ पाचच दिवसांत उखडला !

धावमार्गाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होणे यात भ्रष्टाचार झाला नसेल कशावरून ? कोट्यवधी रुपये खर्चून सिद्ध केलेला धावमार्ग पाचच दिवसांत कसा उखडतो ? अशा प्रकारे पैशांची उधळपट्टी करणार्‍यांकडून पैसे वसूल करायला हवेत !

पुणे येथील खडकवासला जलाशय रक्षण अभियानाची यशस्वी सांगता !

हिंदु जनजागृती समिती, रणरागिणी शाखा आणि समविचारी संघटना यांच्या वतीने संयुक्तरित्या राबवलेल्या ‘खडकवासला जलाशय रक्षण’ मोहिमेची यशस्वी सांगता ३० मार्च या दिवशी करण्यात आली.

पुणे येथील ‘रोझरी स्कूल’चे संचालक विनय अरहाना यांसह दोघे अटकेत !

सीआयडीच्या पथकाने कर्ज अपव्यवहार प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाकडून (‘ईडी’कडून) दोघांना कह्यात घेतले. दोघांना मध्यरात्री शिवाजीनगर येथील विशेष न्यायालयात उपस्थित करण्यात आले.

पुणे येथे लग्नाचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या धर्माधांवर गुन्हा नोंद !

केवळ गुन्हा नोंद करून न थांबता अल्पवयीन मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणार्‍या धर्मांधांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !

पुणे येथे घरफोड्या करणार्‍या मुंबईच्या २ धर्मांधांना मुंबई येथून अटक !

धर्मांधांची गुन्हेगारी वृत्ती मोडून काढण्यासाठी पोलीस कोणत्या उपाययोजना करणार ?
अल्पसंख्यांक म्हणून सरकार अनेक सोयी-सवलती देते, तरी गुन्ह्यांमध्ये त्यांचाच सहभाग अधिक असतो.