कल्याणीनगर प्रकरणातील ७ जणांवर दोषारोप निश्चितीचा मसुदा सादर !

विशेष न्यायाधीश यू.एम्. मुधोळकर यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी चालू आहे. या प्रकरणी न्यायालयाने पोलिसांना डॉ. श्रीहरि हाळनोर आणि शिपाई अतुल घटकांबळे यांची चौकशी करण्यासाठी अनुमती दिली आहे.

चांदीच्या नाणे वाटपासाठी पुणे विद्यापिठाचा लाखो रुपये खर्च !

विद्यापिठाची आर्थिक स्थिती अडचणीची असल्याचे सांगितले जात असतांना चांदीच्या नाण्यांवर खर्च करण्याची काय आवश्यकता ? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

हिंदु धर्माचे रक्षण करणार्‍या उमेदवारांना आगामी निवडणुकीत मतदान करा ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज

पुढे बोलतांना प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज म्हणाले की, देशात समान नागरी कायदा असणे आवश्यक आहे. शिवरायांचा विचार देशात रुजणे महत्त्वाचे आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांचे पसायदान हाच हिंदुत्वाचा जाहीरनामा असल्याचे त्यांनी नमूद केले. 

पुणे येथे गटाराच्या झाकणावर फटाके फोडतांना चेंबरमधील गॅसमुळे स्फोट !

स्फोटांमुळे गटाराचे झाकणही हवेत उडाले. या झाकणाचे तुकडे मुलांना लागल्याने मुले घायाळ झाली.

पुणे येथे आंतरराष्ट्रीय विमानांमध्ये बाँब ठेवल्याची अफवा पसरवल्याच्या प्रकरणी २ गुन्हे नोंद !

कायद्याची भीती नसल्याने कुणीही बाँब ठेवल्याची अफवा सामाजिक माध्यमांद्वारे देतो. अशा आरोपींकडून विमान आस्थापन आणि प्रवासी यांच्या झालेल्या हानीची भरपाई घ्यायला हवी !

गांजा बाळगल्याप्रकरणी पुणे येथे धर्मांधाला अटक !

‘गुन्हे शाखा पथक ६’ने कारवाई करत चांद कासम पठाण याला ३०० ग्रॅम गांजा विक्रीसाठी बाळगल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

पुणे येथे १ कोटी रुपयांचा गुटखा पकडला !

गुटखा उत्पादन करणारे, विकणारे आणि त्याचे सेवन करणारे यांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित !

सकल हिंदु समाजाच्या वतीने पुणे आणि सातारा येथे संत-महंत आणि सहस्रो धर्मप्रेमींच्या उपस्थितीत संत संमेलन पार पडले !

स.प. महाविद्यालय, टिळक रस्ता, पुणे येथे झालेल्या या कार्यक्रमात ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास, अयोध्या’चे कोषाध्यक्ष प.पू स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांनी मार्गदर्शन केले.

शासकीय कर्मचार्‍यांनी शिरस्त्राण वापरणे बंधनकारक !

असा आदेश का द्यावा लागतो ? शासकीय अधिकारी-कर्मचारी स्वत:ला वेगळे समजतात का ?

पश्चिम महाराष्ट्रातील लघुदाब वीज ग्राहकांचे १६ सहस्र १४१ धनादेश ‘बाऊन्स’

पश्चिम महाराष्ट्रात गेल्या सहा महिन्यांत दरमहा सरासरी दोन सहस्र ६९० धनादेश ‘बाऊन्स’ होत आहेत