अनैतिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यावरून महिलेला खाडीत फेकणार्‍याला पोलीस कोठडी

अनैतिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याच्या रागावरून एका महिलेला तालुक्यातील वाडातर येथील पुलावरून खाडीत फेकणार्‍या तरुणाला न्यायालयाने १२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.

बेंगळुरू येथे युवतीचे लैंगिक शोषण करून तिच्या धर्मांतर करण्यासाठी दबाव आणणार्‍या धर्मांधाला अटक

लग्नाचेे अमीष दाखवून युवतीचे लैंगिक शोषण केल्यावर तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव निर्माण करणार्‍या २५ वर्षीय शबाब याला येथील जयनगर पोलिसांनी अटक केली.

आतंकवाद्यांना साहाय्य करणार्‍या काँग्रेसवर बंदी घाला !

जम्मू-काश्मीर पोलिसांनी शोपिया जिल्ह्यात आतंकवाद्यांना पळून जाण्यास साहाय्य केल्याच्या प्रकरणी काँग्रेसचे नेते अधिवक्ता गौहर अहमद वानी यांना अटक केली आहे.

ऊस वाहतूकदार टोळी मुकादमांवर गुन्हे नोंद करा ! – आमदार प्रकाश आबिटकर

मराठवाडा आणि विदर्भातील ऊस मजूर मुकादम यांच्याकडून जिल्ह्यातील ऊस वाहतुकदार मालकांची प्रतिवर्षी लाखो रुपयांची फसवणूक  होते. त्यामुळे या टोळी मुकादमांवर गुन्हे नोंद करण्याची मागणी शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी केली.

वाहतुकीचा नियम चौथ्यांदा मोडल्यास ६ मासांसाठी अनुज्ञप्ती रहित होणार !

वाहतूक विभागाकडून ‘वाहनचालकांनी नियमांचे पालन कटाक्षाने करावे. रस्त्यावर पोलीस नाहीत, हे पाहून नियम मोडण्याचे धाडस करू नये’, असे आवाहन केले आहे.

मुंबई येथे घायाळ युवकाला रुग्णालयात नेण्यास नकार देणार्‍या टॅक्सीचालकांच्या विरोधात गुन्हा नोंद

३ टॅक्सीचालकांना पोलिसांनी विनंती करूनही त्यांनी घायाळ अवस्थेत पडल्याचे आढळूनही रावत यांना रुग्णालयात नेण्यास नकार दिला.

ठाणे येथे ८५ लाख ४८ सहस्र रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत, तिघांना अटक

बनावट चलनी नोटांची विक्री करण्यासाठी आलेल्या सचिन आगरे याला कापूरबावडी परिसरात सापळा रचून अटक करण्यात आली आहे.

महिला आणि बालक यांच्यावरील अत्याचार रोखण्यासाठी जनजागृती करणार ! –  राजेंद्र दाभाडे, पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग

जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पूर्ण जिल्ह्यातील शाळांमध्ये महिलांवरील अत्याचार आणि बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी दिली.

धुळे येथे पोलिसांनी धर्मांधांकडून ३१ तलवारी कह्यात घेतल्या : दोघांना अटक

तलवारींचा साठा मालेगावातून आणल्याचे उघड – या प्रकरणाचा मालेगावशीही संबंध येत असल्याने पोलिसांनी वरवरची कारवाई न करता याची पाळेमुळे खोदून धर्मांधांविरोधात कठोरात कठोर कारवाई करायला हवी !

हुल्लडबाज ट्रॅक्टर चालकांवर दंडात्मक कारवाई करा ! – शिवसेनेचे मुरुगुड पोलीस ठाण्यात निवेदन

प्रतिवर्षी होणार्‍या रस्त्यावरील अपघातांपेक्षा ट्रॅक्टरमुळे अपघात होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.