मुंबई – वाहतुकीचा नियम चौथ्यांदा मोडल्यास ६ मासांसाठी अनुज्ञप्ती रहित करण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन विभागाने घेतला आहे. वाहतूक पोलिसांनी पहिल्या टप्प्यात २ सहस्र चालकांची नावे अनुज्ञप्ती पत्र निलंबित करण्यासाठी दिली आहेत, तसेच यापूर्वी नियम मोडलेल्या चालकांचीही नावे अनुज्ञप्ती पत्र रहित करण्यासाठी पाठवण्यात येणार आहेत. याविषयी वाहतूक विभागाकडून ‘वाहनचालकांनी नियमांचे पालन कटाक्षाने करावे. रस्त्यावर पोलीस नाहीत, हे पाहून नियम मोडण्याचे धाडस करू नये’, असे आवाहन केले आहे.