
सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पूर्ण जिल्ह्यातील शाळांमध्ये महिलांवरील अत्याचार आणि बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी दिली. याचा एक भाग म्हणून कसाल येथील न्यू इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे महिला अत्याचार अन् बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांकरता जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेमध्ये पोलिसांच्या सायबर सेल विभागाकडून सामाजिक माध्यमांतून होणारे अत्याचार आणि त्यावरील उपाययोजना यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि शोषण यांची माहिती प्रभारी पोलीस उपअधीक्षक संध्या गावडे यांनी दिली. या वेळी न्यू इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी, माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस, मुख्याध्यापक कुसगावकर आणि संस्था संचालक मंडळ उपस्थित होते.
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक
पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकतांना पकडलेल्या युवकाची आत्महत्या
खारघर (नवी मुंबई) येथे ‘हेअर स्पा’ करतांना मुसलमान युवकाने हिंदु महिलेचे चुंबन घेतले !