बेंगळुरू येथे युवतीचे लैंगिक शोषण करून तिच्या धर्मांतर करण्यासाठी दबाव आणणार्‍या धर्मांधाला अटक

बेंगळुरू (कर्नाटक) –  लग्नाचे अमीष दाखवून युवतीचे लैंगिक शोषण केल्यावर तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव निर्माण करणार्‍या २५ वर्षीय शबाब याला येथील जयनगर पोलिसांनी अटक केली.

पेट्रोल पंपावर काम करत असलेल्या पीडितेशी गाडीत पेट्रोल भरून घ्यायला येणार्‍या शबाब याने परिचय वाढवला. त्यानंतर तो तिचा भ्रमणभाष क्रमांक घेऊन त्यावर वॉट्सअ‍ॅप संदेश पाठवू लागला होता. त्यानंतर काही दिवसांनी तिच्यावर प्रेम करत असल्याचे त्याने सांगितले. काही दिवसांनी शबाब याने पीडित तरुणीला लग्न करणार असल्याचे सांगत येथील प्रेसिडेंट हॉटेलमध्ये जेवायला घेऊन गेला. रात्री तेथून निघायला उशीर झाल्याने हॉटेलमध्येच खोली आरक्षित करून तेथे दोघे राहिले. तेथे त्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. यानंतर त्यांचे प्रेमप्रकरण चालूच होते. तरुणीने विवाहासाठी दबाव आणल्यावर त्याने धर्मांतर करण्याची अट घातली. त्याला तिने नकार देत पोलिसांत तक्रार केली.