असंवेदनशील मानसिकतेचे उदाहरण !

मुंबई – रेल्वे अपघातामध्ये घायाळ झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात नेण्यास नकार देणार्या ३ टॅक्सीचालकांच्या विरोधात पायधुनी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. ९ डिसेंबरच्या रात्री साडेनऊ वाजता मशिद बंदर येथील रेल्वे मार्गावर राविकेश रावत नावाचा युवक घायाळ अवस्थेत पडल्याचे आढळून आले. याची माहिती मिळताच २ पोलिसांनी त्याला सॅन्डहर्स्ट रोड स्थानकाच्या बाहेर आणले. रावत यांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात नेणे आवश्यक होते; मात्र तेथे उभ्या असलेल्या ३ टॅक्सीचालकांना पोलिसांनी विनंती करूनही त्यांनी रावत यांना रुग्णालयात नेण्यास नकार दिला. त्यानंतर अन्य एका टॅक्सीचालकांनी रावत यांना रुग्णालयात नेले.
परळी (बीड) येथे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन !
पाश्चात्त्य संगीत कार्यक्रमातील तरुणाचा मृत्यू अमली पदार्थ सेवनानेच
वेर्णा येथील आस्थापनांना जेवण पुरवणार्या अस्वच्छ केंद्राच्या विरोधात तक्रार
सासष्टी तालुक्यात तळावली येथे ‘धिर्यो’साठी गर्दी : तक्रार करूनही पोलिसांची कारवाई नाही
सत्तरी तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
वाशी येथे २५ जुलै या दिवशी ‘कारगिल विजय दिवसा’चे आयोजन !