India’s First Hindu Village : छतरपूर (मध्यप्रदेश) येथे देशातील पहिले ‘हिंदु गाव’ स्थापन होणार !

  • पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी केली पायाभरणी

  • गावात असणार संस्कृत शाळा, गोठा आणि यज्ञशाळा

पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी ‘हिंदु गावा’ची पायाभरणी केली

छत्तरपूर (मध्यप्रदेश) – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी येथे एका ‘हिंदु गावा’ची पायाभरणी केली. धीरेंद्रकृष्ण शास्त्री या गावात १ सहस्र हिंदु कुटुंबांना स्थायिक करणार आहेत. हे गाव त्यांच्या पवित्र स्थान गढा गावाजवळ वसवले जात आहे. यासाठी बागेश्वर धामशी संबंधित संस्थेकडून भूमीही उपलब्ध करून दिली जात आहे. येथे २ कुटुंबांनी आधीच घरे बांधण्यास सहमती दर्शवली आहे, तर ५० कुटुंबांनी या गावात स्थायिक होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

या गावाद्वारे हिंदु राष्ट्राचा पाया रचला गेला आहे !

पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी म्हटले आहे की, हिंदु गावापासून हिंदु तालुका, हिंदु जिल्हा आणि हिंदु राज्य निर्माण होईल. गढा येथे गाव नाही, तर हिंदु राष्ट्राचा पाया रचला गेला आहे. हे गाव पुढील २ वर्षात सिद्ध होईल. येथे रहाणार्‍या लोकांना संस्कृत शाळा, गोठा आणि यज्ञशाळा यांसारख्या सुविधा मिळतील.

संपादकीय भूमिका

राजकीय पक्ष आणि नेते नाही, तर संतच हिंदु राष्ट्र प्रत्यक्ष निर्माण करू शकतात, हेच यावरून लक्षात येते !