हिंदु जनजागृती समितीने घेतली बागेश्‍वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांची सदिच्छा भेट !

हिंदु राष्ट्राचे ग्रंथ काळाची आवश्यकता ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

ग्रंथ भेट देऊन पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्याशी संवाद साधतांना श्री. प्रशांत जुवेकर

जळगाव – जिल्ह्यातील झुरखेडा येथे बागेश्‍वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या हनुमंत कथेचे आणि दिव्य दरबाराचे आयोजन २६ ते ३० डिसेंबर या कालावधीत करण्यात आले आहे. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने त्यांची सदिच्छा भेट घेण्यात येऊन कार्यकर्त्यांनी त्यांचे शुभाशीर्वाद घेतले. समितीच्या वतीने प्रकाशित ‘हिंदु राष्ट्र’ या विषयावरील ग्रंथांचा संच शास्त्रीजी यांना भेट देण्यात आला. संच पाहून पंडितजी म्हणाले, ‘‘आज या ग्रंथांची आवश्यकता आहे. हे हिंदी भाषेत असल्याने त्यांचा लाभ होईल.’’ या वेळी समितीच्या वतीने सर्वश्री प्रशांत जुवेकर, विनोद शिंदे, धीरज भोळे, निखिल कदम उपस्थित होते.

कथेच्या स्थळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बांगलादेशातील हिंदूंवरील आघातांविषयी निदर्शने !

निदर्शने करतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि धर्मप्रेमी

झुरखेडा येथील कथेच्या ठिकाणी लाखो भाविक भेट देत आहेत. या भाविकांना हिंदूंवर होणार्‍या आघातांविषयी कळावे, यासाठी हिंदु जनजागृती समितीने जागृतीपर फलक हातात घेऊन निदर्शने केली. यात प्रामुख्याने बांग्लादेशात होणार्‍या हिंदूंवरील अत्याचार, तसेच लव्ह जिहाद, हलाल जिहाद अशा विषयांवर, तसेच ‘भारतात अवैधपणे रहाणार्‍या बांगलादेशी मुसलमान नागरिकांना देशाबाहेर काढून टाकावे’, अशा मागण्यांच्या फलकांचा अंतर्भाव होता. अनेक भाविकांनी याला समर्थन दिले. हिंदु जनजागृती समितीच्या धर्मशिक्षण, तसेच स्वरक्षण प्रशिक्षणवर्गांत येणार्‍या धर्मप्रेमींनी यात सक्रीय सहभाग घेतला.