काँग्रेसचे प्रवक्ते अब्बास हाफिज यांची पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या हिंदु गावावरून मागणी !

छतरपूर (मध्यप्रदेश) – येथे हिंदु गावाची पायाभरणी पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी केल्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते अब्बास हाफिज यांनी त्यावर टीका केली आहे. अब्बास हाफिज यांनी राज्याचे मुख्यमंत्री मोहन यादव यांना सांगितले की, जर देशाची राज्यघटना धर्माच्या आधारावर गावे वसवण्यास आणि बांधण्यास अनुमती देते, तर मला मुसलमान गाव, ख्रिस्ती गाव आणि शीख गाव बांधण्याची अनुमतीही दिली पाहिजे.
आदरणीय मुख्यमंत्री मोहन यादव जी,
यदि देश का संविधान ऐसे धर्म के आधार पर गांव बसाने व बनाने की अनुमति देता है तो मुझे भी मुस्लिम ग्राम, ईसाई ग्राम व सिख ग्राम बनाने की अनुमति दी जाए। pic.twitter.com/IAoQmHwpMg— Abbas Hafeez (@AbbasHafeez) April 4, 2025
संपादकीय भूमिकाअफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आदी इस्लामी देशांत अन्य धर्मियांसाठी एकतरी गाव बांधण्यात आले आहे का ? याचे उत्तर अब्बास देतील का ? उलट त्यांचा वंशसंहारच करण्यात आला आहे आणि येत आहे ! |